गंगापुरात मॉबलीचींग विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:51 PM2019-07-02T15:51:35+5:302019-07-02T16:19:30+5:30

मॉबलीचींग मधून हत्या प्रकरणात आरोपींना फाशी देण्याची मागणी

A rally on the Tehsil office against the Mobilizing in Gangapur | गंगापुरात मॉबलीचींग विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा 

गंगापुरात मॉबलीचींग विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा 

googlenewsNext

गंगापुर (औरंगाबाद ) : मुस्लिम व दलित समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तबरेज अन्सारी या तरुणाची मॉबलीचींगमधून हत्या झाली, या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मंगळवारी (दि. २) दुपारी 11.30 वाजता गंगापुर शहरातील सोमाणी ग्राउंड पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली या मोर्चात तरुणाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. हातात विविध फलक घेवून हा मोर्चा राजीव गांधी चौक, आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे घोषणा देत तहसील कार्यालयावर येवून धडकला. या ठिकाणी यूसुफखान यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने तबरेज अन्सारी या मुस्लिम तरुणाला  गंभीर मारहाण केल्यानेच या तरुणाचा मृत्यु झाला, यातील आरोपींना फाशीची शिक्षा दयावी. तर रामनाथ शिराळे यांनी देखील झाल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून दलित-मुस्लिम समाजास स्वसंरक्षणात शस्र परवाने देण्याची मागणी केली.

यानंतर लहान मुलांच्या हस्ते प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदन महसूल प्रशासनाकडून राजपूत व मगरे यांनी  स्विकारले. उपविभागीय पोलीस अधिकारी आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पो.उ.नि. गजेंद्र इंगळे, चाटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

Web Title: A rally on the Tehsil office against the Mobilizing in Gangapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.