रमजान ईद उत्साहात
By Admin | Published: July 8, 2016 12:15 AM2016-07-08T00:15:22+5:302016-07-08T00:34:54+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात रमजान ईद पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली.
जालना : शहरासह जिल्ह्यात रमजान ईद पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच ईदगाह मैदान व मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधवांना सर्व समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख मौलाना तसेच मुफ्ती यांनी मार्गदर्शन केले.
गुरूवारी सकळीच हजारो मुस्लिम बांधवांनी पारंपरिक तसेच नवीन पोशाख परीधान करून ईदगाह मैदान गाठले. कदीम जालना, सदर बाजार व गांधीनगर येथील ईदगाह मैदान व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी रमजाननिमित्त विशेष नमाज अदा केली. कदीम जालना ईदगाह मैदानावर ईदगाह सकाळी १० वाजता मुफ्ती रहमान यांनी नमाज पठण केले. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, इकबाल पाशा, उपविभागीय अधिकारी श्रीकर चिंचकर, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, बाबूराव सतकर, शब्बीर अन्सारी, डॉ. बद्रोद्दीन, अॅड. मुज्जमील, सत्संग मुंढे, राम सतकर, गणेश सुपारकर, अब्दुल हफिज, शेख महेमूद, बळीराम महाराज जोगस, राम सावंत आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी मुस्लिम बांधवांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या.
ईदगाह सदर बाजार येथे सकाळी १०.३० वाजता नमाज अदा करण्यात आली. यावेळी नूर मोहंमद यांनी नमाज पठण केले.
याप्रसंगी नूर खान, रशीद पहेलवान, राजेश राऊत, गणेश राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्याचबरोबर ईदगाह गांधीनगर- सकाळी १० वाजता, दर्गा राजाबाग शेर सवार- सकाळी १०.१५ वाजता,मिया साहब दर्गा- सकाळी १० वाजता,गुलजार मशीद (मंगळबाजार) - ९.३० वाजता, जामा मशीद (जुना जालना) - १०.१५ वाजता, मदीना मशीद( जुना जालना)- सकाळी ९ वाजता येथे नमाज अदा करण्यात आली. (प्रतिनिधी)