रेशनचा १९ क्विंटल तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:46 AM2017-10-27T00:46:30+5:302017-10-27T00:46:30+5:30
काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले.
पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील स्वस्तधान्य दुकानदाराने पाथरी येथील गोदामातून शासकीय योजनेचे धान्य नेल्यानंतर हे धान्य ग्रामपंचायत कार्यालयात टाकले होते. यातील ६० टक्के धान्याचे गावात वाटप केले. काही धान्य वाटप करणे बाकी होते. २५ आॅक्टोबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर टेंपो एम.एच.३८-१९४७ असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी जवळ जावून पाहिले असला तांदळाचे ३८ कट्टे वाहनामध्ये आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी वाहनाच्या चाकातील हवा सोडून दिली. त्यानंतर पोलिसांनी तहसील प्रशासनाला त्याची माहिती दिली.
पोनि.सोहन माचरे यांच्यासह चार पोलीस कर्मचारी, तहसीलदार वासुदेव शिंदे, नायब तहसीलदार निलेश पळसकर, मंडळ अधिकारी जे.डी. बिडवे, तलाठी अतुल शिंदे यांनी पहाटे घटनास्थळी जावून माहिती घेतली. २६ आॅक्टोबर रोजी याचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.