रानडुकराने केली ज्वारी भुईसपाटा
By Admin | Published: December 19, 2015 11:25 PM2015-12-19T23:25:18+5:302015-12-19T23:53:15+5:30
, बीड दुष्काळाच्या दाहकतेमध्येही तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेल्या ज्वारीचा एका रात्रीत रानडुकरांनी काटा काढला. ऐन डौलात उभी असलेली आठ फुटी ज्वारी
, बीड दुष्काळाच्या दाहकतेमध्येही तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेल्या ज्वारीचा एका रात्रीत रानडुकरांनी काटा काढला. ऐन डौलात उभी असलेली आठ फुटी ज्वारी आडवी झाल्याची पाहून उभ्या वावरातच शेतकऱ्यांनी अक्षरश: टाहो फोडला. वनविभागाच्या नाकर्तेपणाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने वनधिकारी काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निसर्गाने तर गेल्या तीन वर्षापासून अवकृपा दाखवली आहेच. असे असतसनाही योग्य नियोजन करून बीड तालुक्यातील नागझरी येथील चंद्रसेन कळसुले यांनी आडीच एकरात ज्वारीचा पेरा केला होता. जमिन बागायत असल्याने ज्वारी बहरात होती. आठ फुटी ज्वारी आता पोटऱ्यात येऊन निसवली होती. अशातच रानडुकरांच्या उपद्रवाने आठ फुटी उभी ज्वारी एका रात्रीत आडवी झाली. शेतजमिनी लगतच वनक्षेत्र असल्याने सातत्याने हरिण, रानडुकरांचा त्रास हा नित्याच झाला होता. यंदा दुष्काळी परिस्थितीमध्येही ज्वारी पिक चांगले होते. त्यामुळे कळसुले यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे अनेक वेळा केली होती. मात्र, विभागाकडून दुर्लक्ष केल्यानेच पिकाचे नुकसान झाले असल्याने हताश झालेल्या कळसुले यांनी लिंबागणेश ठाण्यात वनअधिकारी काळे यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे. शेतकऱ्याने नुकसानीसंदर्भात रीतसर तक्रार नोंद केल्यास नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी एस. पी. काळे म्हणाले. दुष्काळात तेरावा दुष्काळी परिस्थितीने खरीपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात आहे. केवळ ज्वारी हे पिक थोड्याबहुत प्रमाणात आहे. यालाही रानडुकरांचा धोका होत आहे. निसर्गाची अवकृपा त्यात प्रशासनाची उदासीनता यामुळे दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी दुहेरी कात्रीत आहेत.