शेतकºयांच्या पुन्हा बँकेत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:48 AM2017-09-15T00:48:32+5:302017-09-15T00:48:32+5:30
शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेतकºयांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज योजनेंतर्गत रात्रंदिवस एक करुन लांबलचक रांगेत उभे राहून कर्जमाफीचे अर्ज भरले. अजूनही काही शेतकºयांची या रांगेपासून सुटका होत नाही तोच कर्जमाफीच्या यादीत नावे असलेल्या शेतकºयांना पुन्हा शासन निर्णयाच्या बदलामुळे रांगेत ताटकळत उभे राहून कागदपत्रे बँकेत जमा करावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी सन्मान की अवमान योजना हेच कळायला मार्ग नसल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे.
शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून हैराण आहेत. एवढेच काय तर शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावर रात्री एक ते दीड वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी रांगेत ताटकळत बसत आहेत. यामध्येही रोज मोजक्याच शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येते होते. उर्वरितांना दुसºया दिवशी पुन्हा मोठी पायपीट करावी लागली. एवढी पायपीट करुनही शेतकºयांचे कर्ज माफ होईल किंवा नाही याची शाश्वती नाही. तरीही कर्जमाफीसाठी शेतकºयांची कसरत सुरु आहे. विशेष म्हणजे शासनाने कर्जमाफीसाठी एवढे निकष घातले आहेत. ते पूर्ण करता - करताच अर्ज भरण्याची शेवटची तारीख येऊन ठेपली आहे. आता तर जिल्ह्यातील शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन भरणेही पूर्ण झाले नसले तरी आता पुन्हा शासनाने नवीन फतवा काढून शेतकºयांना पेचात पाडले आहे. आॅनलाईन भरलेले कर्जमाफीचे अर्ज, त्याची पावती, तसेच सातबारा, होल्डींग, कर्ज खात्याची झेरॉक्स, आधार कार्ड, बचत खात्याची झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांनी अर्ज भरले होते, असे शेतकरी नुकतेच शांत झाले होते. आता नव[न सूचनांमुळे पुन्हा शेतकºयांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे बँकेच्या रांगेत पुन्हा शेतकरी ताटकळत उभे राहिले होते. तर काही वयोवृद्ध शेतकºयांना उभे राहणे शक्य नसल्याने बसून होते. येथील भारतीय स्टेट बँकेत शेतकºयांची अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. त्यामुळे बँकेत इतर व्यवहार बंद करुन शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. १६ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचे अर्ज भरता येणार आहेत. आता तर सात बारा आणि होल्डींग केवळ दोन दिवसात भरणे होतील का? हा यक्ष प्रश्न शेतकºयांसमोर पडला आहे. एवढे करुनही कर्ज माफ झाले नाही तर मेहनतीवर पाणी पडेल.