रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:04 AM2021-01-02T04:04:27+5:302021-01-02T04:04:27+5:30

रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत योगेश पायघन औरंगाबाद : जिल्ह्यात ८६७ पैकी डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या ...

Ranjangaon Shenpunji is the largest, while Shivgadtanda is the smallest gram panchayat | रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत

रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत

googlenewsNext

रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत

योगेश पायघन

औरंगाबाद : जिल्ह्यात ८६७ पैकी डिसेंबरअखेर मुदत संपलेल्या ६१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. निवडणूक लागलेल्या ६१८ ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या आणि मतदारसंख्येच्या दृष्टीकोनातून रांजणगाव शेणपुंजी सर्वात मोठी तसेच जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत, तर शिवगडतांडा सर्वात लहान ग्रामपंचायत आहे. वित्त आयोग, योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांपेक्षा ग्रामपंचायत सदस्य होण्यात अधिकांना रस आहे. त्यात सरपंचपद आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने पॅनलसाठी पुढाकार घ्यायला कुणी समोर येईना. त्यामुळे सध्या वैयक्तिक अर्ज भरणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे.

दीड लाखाच्या जवळपास लोकसंख्या, साडेपाचशेहून अधिक कंपन्या, मोजकीच मतदार नोंदणी, त्यातही ७० टक्क्यांहून अधिक कामगार अशी जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजीची आहे. कंपन्यांकडून मिळणारा कर आणि लोकसंख्याही सर्वाधिक असल्याने निधीही त्या तुलनेत सर्वाधिक मिळतो. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत सदस्य होण्याकडे सर्वच आजी, माजी, हाैशींचा ओढा आहे. १७ सदस्यपदांसाठी शंभरहून अधिक जणांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

सरपंचपदाची आरक्षण सोडत नंतर जाहीर होणार असल्याने सध्या सर्वच जण वैयक्तिक अर्ज भरत असून, पॅनलची केवळ चर्चा आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली तरी गेल्या दहा वर्षांपासून आमदार प्रशांत बंब समर्थकांकडे असलेली रांजणगावच्या ग्रामपंचायतीची सत्तासूत्रे यावेळी कामगार कुणाकडे सोपवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, तर औरंगाबाद तालुक्यातील शिवगड सात सदस्य आणि ३ वाॅर्डची ग्रामपंचायत असून, अद्यापही पॅनलची रचना झालेली नसल्याने नवख्यांसह आजी-माजींनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. लहान ग्रामपंचायत असली तरी सात जागांसाठी शिवगडमध्ये होणारी निवडणूक रंगतदार होईल, असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, दोन्ही ग्रामपंचायतींचे चित्र अर्ज माघारीनंतर पॅनल बनल्यानंतरच स्पष्ट होईल.

चौकट...

-निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : ६१८

-सर्वात मोठी ग्रामपंचायत रांजणगाव शेणपुंजी

एकूण मतदान २७,२७४

सदस्य संख्या १७

पुरुष मतदार १६,३६४

महिला मतदार १०,९१०

सर्वात लहान ग्रामपंचायत शिवगडतांडा

एकुण मतदार ४९६

सदस्य संख्या ७

पुरुष मतदार २६२

महिला मतदार २३४

Web Title: Ranjangaon Shenpunji is the largest, while Shivgadtanda is the smallest gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.