लग्नाच्या आमिषाने मैत्रिणीवर अत्याचार; आरोपी मित्राचे औरंगाबादमधून पलायन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:23 PM2018-09-08T12:23:29+5:302018-09-08T12:24:48+5:30

तरुणाने मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला

Rape on girlfriend by giving marriage promise;accused friend Escaped from Aurangabad | लग्नाच्या आमिषाने मैत्रिणीवर अत्याचार; आरोपी मित्राचे औरंगाबादमधून पलायन  

लग्नाच्या आमिषाने मैत्रिणीवर अत्याचार; आरोपी मित्राचे औरंगाबादमधून पलायन  

googlenewsNext

औरंगाबाद : मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पुन्हा अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. ही घटना सिडकोतील मिसारवाडी येथे २५ जून २०१७ ते २१ जून २०१८ या कालावधीत घडली. 

विक्रम सदाशिव साळवे (२१, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, पीडितेचे आयटीआयपर्यंत शिक्षण झालेले आहे. ती आणि आरोपी हे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. यावेळी त्यांच्यात ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून गतवर्षी २५ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता मिसारवाडी येथील त्याच्या घरी नेले. लग्नासंदर्भात आईसोबत बोलायचे असल्याचे त्याने सांगितल्याने ती त्याच्यासोबत गेली होती. त्याचे आई-वडील एका खोलीत झोपलेले असताना आरोपीने पीडितेला शेजारच्या खोलीत नेले. तेथे त्याने तिच्यावर प्रथम अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्यासोबत त्याच्या आणि तक्रारदार तरुणीच्या घरी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. मात्र लग्नाचे वचन त्याने पाळले नाही.

२१ जून रोजी त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तो बाहेरगावी पळून गेला. तो तिचे फोन घेईना. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडितेने सिडको ठाणे गाठून ५ सप्टेंबर रोजी आरोपीविरोधात तक्रार नोंदविली. लग्नाच्या आमिषाने आरोपीने आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. के. झुंजारे तपास करीत आहे.

Web Title: Rape on girlfriend by giving marriage promise;accused friend Escaped from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.