लातूरच्या महिलेवर वाळूजमध्ये बलात्कार
By Admin | Published: April 22, 2016 12:44 AM2016-04-22T00:44:03+5:302016-04-22T00:58:11+5:30
वाळूज महानगर : लातूर जिल्ह्यातील एका २६ वर्षीय महिलेवर वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनीत दोनदा बलात्कार करणारा आरोपी व तिची बदनामी करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले.
वाळूज महानगर : लातूर जिल्ह्यातील एका २६ वर्षीय महिलेवर वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनीत दोनदा बलात्कार करणारा आरोपी व तिची बदनामी करणाऱ्या त्याच्या तीन साथीदारांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले.
तुषार राजपूत असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रभारी पो. नि. सुरेशकुमार टाक यांनी सांगितले की, पीडित महिलेशी आरोपीने संपर्क साधून तुझा पती आमच्याकडे आला असल्याचे सांगितले. त्यामुळे ती महिला लातूरहून पतीला भेटण्यासाठी वाळूजला ८ नोव्हेंबर २०१५ ला आली होती. येथे आल्यानंतर आरोपी राजपूतने त्या महिलेला मारहाण करून दोनदा बलात्कार केला. आरोपी तुषार राजपूतचे साथीदार सागर अवचरमल, विजय वरणकर व विकास (पूर्ण नाव माहीत नाही) हे म्हाडा कॉलनीत तुषारच्या घरी थांबलेले होते. घटनेनंतर महिलेने याची वाच्यता केली नाही व पुन्हा मूळगावी परत गेली. दरम्यान, या पीडित महिलेच्या पतीचा वाढदिवस असल्यामुळे १६ डिसेंबर २०१५ रोजी आरोपी तुषार राजपूत व त्याचे साथीदार भेटले होते. आरोपींनी तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले होते. त्या महिलेचे फोटो लोकांना दाखवून ही महिला वेश्या व्यवसाय करते, असे म्हणून तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार लक्षात आल्यामुळे महिलेने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन प्रकाराची माहिती दिली. पीडित महिलेवर बलात्कार व तिची बदनामी केल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरूहोती.