Rapper Raj Mungase: इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 04:01 PM2023-04-12T16:01:20+5:302023-04-12T16:04:21+5:30

Rapper Raj Mungase: 50 खोके अन् गुवाहाटी, यावर रॅप बनवणारा छत्रपती संभाजीनगरमधील रॅपर राज मुंगासे आज माध्यमांसमोर आला.

Rapper Raj Mungase came in front of media, said why he was underground | Rapper Raj Mungase: इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला...

Rapper Raj Mungase: इतक्या दिवस का लपून राहिला? रॅपर राज मुंगासे मीडियासमोर आला, मोठा खुलासा केला...

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी रॅपर राज मुंगासे यांने राज्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे रॅप सॉन्ग तयार केले होते. या रॅपमध्ये त्याने '50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी' अशा शब्दांचा वापर केला होता. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना(उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती. अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. अंबादास दानवे यांनीच आज फेसबुकवर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाला राज मुंगासे?
माध्यमांसमोर आलेल्या राजने सांगितले की, त्याला अटक झाली नव्हती. त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता, त्यानंतर पोलीस त्याच्या घरीही गेले होते. तो रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचेही त्याने सांगितले. पण मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही, कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही 50 खोके घेतलेच नसतील तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेत आहात? मी फक्त ‘चोर’ असा उल्लेख करत गाणं बनवलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुमच्या मनाला लागणं सहाजिक गोष्ट आहे, असं राज म्हणाला. 

राज पुढे म्हणाला की, एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने अंबादास दानवे यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर दानवेंनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला आणि त्यांनीच राजला मदत केली. त्या दिवसापासून राज मुंगासे अंडरग्राऊंडच होता. त्याने आई-वडिलांनाही कुठे जातोय, याची माहिती दिली नव्हती. तो पुढे म्हणाला की, पोलीस ताब्यात घेतील याची भीती होती. अटकपूर्वी जामीन करायचा होता आणि त्या काळात तीन दिवस सुट्टी होती, म्हणून लपून राहावं लागलं, असा खुलासा राज मुंगासे याने केला.

अंबादानस दानवेंचा पोलिसांना इशारा
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राजला सर्व मदत केली आहे. जामीन झाल्यानंतर तेच राजला मुंबईवरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आपल्या गाडीतून घेऊन येत आहेत. माध्यमांशी बोलताना राज मुंगासे याला पोलिसांनी त्रास देऊ नये असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे. राज याने कुठलाही गुन्हा केलेला नाही. कुठतरी गुन्हा दाखल झाला म्हणून त्याच्यावर पोलिसांनी अन्याय करू नये असेही दानवे यांनी म्हंटले आहे.

Web Title: Rapper Raj Mungase came in front of media, said why he was underground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.