बायपास बंबटनगर येथे आढळला दुर्मीळ मृदुकाय साप!

By साहेबराव हिवराळे | Published: May 16, 2023 08:53 PM2023-05-16T20:53:37+5:302023-05-16T20:53:56+5:30

साप दिसला तर मारू नका, सर्पमित्रांना संपर्क करावा.

Rare smooth snake found in beed Bypass Bambatnagar! | बायपास बंबटनगर येथे आढळला दुर्मीळ मृदुकाय साप!

बायपास बंबटनगर येथे आढळला दुर्मीळ मृदुकाय साप!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: बीड बायपास भागात दुर्मीळ मृदुकाय साप आढळला आहे. हा मराठवाड्यातील अत्यंत दुर्मीळ साप असून, तो बीडबायपास बंबटनगर येथे एका घराच्या परिसरात आढळून आला.

स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र व मानद वन्य जीवरक्षक डॉ.किशोर पाठक यांना सापाची माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र मनोज गायकवाड, विकी वाडेकर यांना घटनास्थळी पाठविले. साप बघताच अत्यंत दुर्मीळ असल्याचे जाणवले. हा साप बिनविषारी असून, दगडी तपकिरी रंगाचा व खूप मुलायम आहे. या सापाला इंग्लिशमध्ये (Smooth Snake) म्हणतात.

मागील काही दिवसांपूर्वी बंबटनगरच्या भागातच अत्यंत दुर्मीळ असा अल्बिनो दिवड साप (वॉटर स्नेक) पकडण्यात आला होता. त्या भागात अत्यंत दुर्मीळ साप सापडत आहेत.

साप दिसला तर मारू नका, सर्पमित्रांना संपर्क करावा.

बंबाटनगर परिसरात शेती असलेला परिसर मानला जातो, कित्येक वर्षे येथे वसाहत हळूहळू वाढत असल्याने नागरिकांची गजबज वाढली. नैसर्गिकदृष्ट्या प्रजातीला वातावरण असह्य होत आहे आणि ते खाद्य शोधासाठी बाहेर पडल्यास व नागरिकांच्या निदर्शनात आल्यास त्यांंनी सर्पमित्रांना संपर्क करावा, असेही आवाहन करण्यात आलेले आहे.

Web Title: Rare smooth snake found in beed Bypass Bambatnagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.