हळदा गावाजवळ आढळला ‘दुर्मीळ पिवळा पळस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:08 AM2021-03-13T04:08:01+5:302021-03-13T04:08:01+5:30

सिल्लोड : वसंत ऋतूच्या आगमनानंतर पळस हा देशी, स्थानिक वृक्ष फुलांनी बहरू लागतो. पळसाला लाल भगवी ...

Rare yellow palm found near Halda village | हळदा गावाजवळ आढळला ‘दुर्मीळ पिवळा पळस’

हळदा गावाजवळ आढळला ‘दुर्मीळ पिवळा पळस’

googlenewsNext

सिल्लोड : वसंत ऋतूच्या आगमनानंतर पळस हा देशी, स्थानिक वृक्ष फुलांनी बहरू लागतो. पळसाला लाल भगवी फुले येतात. या लाल - भगव्या फुलांनी लगडलेल्या झाडाकडे पाहिले की, जंगलात वणवा पेटलाय असा भास होतो. म्हणून पळसाला "फ्लेम ऑफ फॉरेस्ट" असे म्हटले जाते. सर्वत्र राना-वनात, डोंगररांगात भगव्या फुलांचा पळस वृक्ष लक्ष वेधून घेत आहे. पळस वृक्षाचा पिवळी फुले उमलणारा एक दुर्मीळ प्रकार हळदा गावाजवळ पाहावयास मिळाला आहे. पळसाने जणू पिवळा पितांबर नेसला, असा सुंदर आकर्षक देखावा दिसून आला.

वाघूर नदीच्या काठाजवळ उंडणगाव रस्त्याच्या बाजूला हा पिवळा धमक पळस नजरेस पडला आहे. हा दुर्मीळ वृक्ष बराच जुना असून, १५ ते १८ फूट उंच असतो. स्थानिकही याबाबत अनभिज्ञ होते. आता मात्र हा विषय पंचक्रोशीत कुतुहलाचा ठरला आहे. पळसाच्या फुलांचा रंग लाल भगवा अशीच वस्तुस्थिती सर्वत्र असते. मात्र, राज्यभरात काही मोजक्या भागांमध्ये पिवळा पळस वृक्ष असल्याची नोंद आहे. या झाडाची फुले हळदीसारखी एकदम पिवळी जर्द असतात.

नैसर्गिक रंग

प्राचीन काळापासून पळसापासून नैसर्गिक रंग बनवतात. हा रंग अन्नपदार्थ, आइस्क्रीम, मिठाई, चॉकलेट, सरबत आदी खाद्यपदार्थांमध्ये वापरता येतो. हानिकारक रासायनिक रंगास तो उत्तम पर्याय आहे. पळस पाने, फुले यात अनेक औषधी तत्व आहेत. ती आयुर्वेदात ‘कशाय’ गुणधर्माची वर्णिलेली असून, पचन क्षमता वाढवणारी आहे.

संवर्धित करणे गरजेचे...

बुरशीजन्य त्वचारोग, यकृत विकार यावर लाभकारी आहे. पळस हा फक्त भारतातच आढळत असल्याने संपूर्ण जगाची नैसर्गिक खाद्य रंगाची गरज आपण भागवू शकतो. यासाठी लाल व अतिदुर्मीळ पिवळा पळस संवर्धित करणे गरजेचे आहे

- डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड.

फोटो : पिवळा पळस बहरला

Web Title: Rare yellow palm found near Halda village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.