‘सखी उत्सव’तर्फे रास दांडियाची मेजवानी
By Admin | Published: September 25, 2014 12:58 AM2014-09-25T00:58:38+5:302014-09-25T00:59:19+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सव म्हटला की सर्वांनाच रास दांडियाची आठवण येते. नवरात्राच्या या नऊ दिवसांच्या दांडियाच्या निमित्ताने महिला धमाल मस्ती करतात.
औरंगाबाद : नवरात्रोत्सव म्हटला की सर्वांनाच रास दांडियाची आठवण येते. नवरात्राच्या या नऊ दिवसांच्या दांडियाच्या निमित्ताने महिला धमाल मस्ती करतात. ही मौज अनुभवण्याची सुवर्णसंधी लोकमत सखी मंचने उपलब्ध करून दिली आहे.
लोकमत सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवाद्वारे घेण्यात आलेल्या ‘अप्सरा आली’ आणि ‘वन मिनिट गेम शो’ यासारख्या दर्जेदार कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्साहपूर्ण वातावरणात मजा केली.
आता दांडियाच्या निमित्ताने महिलांना आनंद लुटण्याची पुनश्च एक संधी मिळाली आहे. सखी मंचतर्फे आयोजित सखी उत्सवांतर्गत धमाल दांडियामध्ये महिलांना मनसोक्त जल्लोष करण्याची ही सुवर्णसंधी आहे. हा दर्जेदार कार्यक्रम २६ सप्टेंबर, शुक्रवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम लोकमत लॉन, लोकमत भवन, जालना रोड येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिलांना या कार्यक्रमात आनंदोत्सव साजरा करण्याची संधी असल्याने जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व महिलांना प्रवेश खुला आहे. तसेच लहान मुलांना प्रवेश नाही. या कार्यक्रमासाठी प्रवेश मागील गेटने असेल.