'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

By बापू सोळुंके | Published: November 20, 2023 01:31 PM2023-11-20T13:31:59+5:302023-11-20T13:42:51+5:30

जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

'Rastraroko will continue until water recedes'; Leaders of all parties are aggressive for the water of Marathwada | 'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

'मराठवाड्यासाठी पाणी सुटेपर्यंत रास्तारोको सुरूच राहणार';आक्रमक आंदोलनाने जालना रोड ठप्प

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी रोखून धरले आहे. यामुळे मराठवाड्यातील जनतेमध्ये संताप आहे. आज सकाळी सिंचन भवनसमोर जालना रोडवर हक्काचे पाणी सोडावे या मागणीसाठी सर्वपक्षीय रस्तारोको करण्यात येत आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, संघटना सहभागी झालेल्या या रस्तारोकोने जालना रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे. 

यावेळी जालना रोडच्या दोन्ही लेनवर आंदोलक बसल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला. आंदोलनात सहभागी नेत्यांची पाणीप्रश्नावर एकजूट दिसून आली. या आंदोलनात माजी मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाठ, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे ,अण्णासाहेब माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार किशोर पाटील ,माजी आमदार नामदेव पवार, अमरसिंह पंडित,  बदामराव पंडित, माजी महापौर नंदकूमार घोडेले, उद्योजक अर्जुन गायके, मसीआ संघटनेचे पदाधिकारी पाणी हक्क परिषदेचे पदाधिकारी यांच्यासह भाजप वगळता सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

मराठवाड्यातील जनतेला गृहीत धरू नये
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यातील जनतेला राज्य सरकारने गृहीत धरू नये. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय हे पाणी 15 ते 20 सप्टेंबर दरम्यान सोडणे आवश्यक होते. मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकर्ते संचालकांनी 30 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन 20 दिवस उलटले तरी अद्याप 8.6 टीएमसी पाणी दिले गेले नाही.

आता शांत बसणार नाही 
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाण्याची गरज आहे. असे असताना अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी मुद्दामहून आपले पाणी रोखून धरले याचा फटका गोरगरीब जनता शेतकरी उद्योजक यांना बसणार आहे. यामुळे आम्ही आता शांत बसणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाठ यांनी दिला. तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर मराठवाड्यातील एकाही आमदाराने हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊ नये असे आवाहनही शिरसाठ यांनी घ्यावी केले. 

संयम सुटत चालला आहे
अर्जुन खोतकर म्हणाले, मराठवाड्यातील जनता शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारी आहे. संतांच्या भूमितील असल्यामुळे आधी विनंती केली, निवेदने दिली परंतु, पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे आता आमचा संयम सुटत चालला आहे. जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. 

Web Title: 'Rastraroko will continue until water recedes'; Leaders of all parties are aggressive for the water of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.