रेशनचा २२० क्विंटल गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:05 AM2017-09-10T00:05:13+5:302017-09-10T00:05:13+5:30
काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा रेशनचा २२० क्विंटल गहू पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास शहरातील इसाद रोडवर पकडला़ नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा रेशनचा २२० क्विंटल गहू पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास शहरातील इसाद रोडवर पकडला़ नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
दत्त मंदिर भागातील इसाद रोडवर पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी एमपी ०९/एचएफ ३७४० या क्रमांकाचा ट्रक आणि एमएच ०४ एफयू १४९८ या क्रमांकाचा टेम्पो पकडला. वाहनांसंदर्भातील माहिती उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांना दिली़ त्यानंतर वाहनांची तपासणी केली असता, ट्रकमध्ये १८० क्विंटल तर टेम्पोमध्ये ४० क्विंटल असा २२० क्विंटल रेशनचा गहू असल्याचे समोर आले़ रात्री ११़३० वाजेच्या सुमारास तहसीलदार आसाराम छडीदार यांनी पंचनामा केला़ उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनीही इसाद रोडवरील गोदामाची पाहणी करून मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पकडलेली दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात जमा केली़ या प्रकरणी नायब तहसीलदार गणेश चव्हण यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी नागरगोजे याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी भोसले, तहसीलदार छडीदार, पोलीस निरीक्षक सिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, फौजदार भाऊसाहेब मगरे, तलाठी बिलापट्टे, मुरकुटे, सुक्रे, मंडळ अधिकारी शंकर राठोड आदींची रात्री उशिरापर्यंत उपस्थिती होती़