काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:19 AM2017-11-01T00:19:11+5:302017-11-01T00:19:36+5:30
धाड : काळा बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार्या रेशनचा तांदूळ पकडल्याची कारवाई धाड पोलिसांनी २९ ऑक्टोबरच्या दुपारी २ वाजता धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या वरुड रंगाप्पा येथील बसथांब्यावर केली. यावेळी आरोपींच्या ताब्यातून ४0 हजार रुपयांच्या रेशनच्या तांदळासह २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठोणदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा जिल्ह्याच्या नव्हे, तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धाड पोलीस स्टेशन हद्दीतील काही गावे बेकायदा व्यवसायांसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, शिवना जि. औरंगाबाद येथील दोन रेशन माफिया धाड परिसरातील काही रेशन दुकानदारांकडून खरेदी केलेला गरिबांच्या हक्काचा तांदूळ धावडा जि. जालना येथे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलीस नाईक प्रकाश दराडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोकडे, पोलीस हवालदार सावळे, पोलीस नाईक प्रकाश दराडे, खंडागळे, शितोड व गजानन मोरे यांनी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता वरुड रंगाप्पा ता. बुलडाणा येथे सापळा रचला.
यावेळी आपल्या ताब्यातील दुचाकीवरून आरोपी शेख मुजफ्फर शेख फय्युम (वय १९ वर्षे) व आफताब मोहमद उस्मान कुरेशी (वय ३0 वर्षे) दोघे रा. शिवना जि. औरंगाबाद हे रेशनचा १ क्विंटल तांदूळ घेऊन जाताना रंगेहात मिळून आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता, त्यांनी शिवना येथील रहिवाशी असल्याचे सांगत सदर तांदूळ धावडा येथे असलेल्या गोडाउनमध्ये घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी धावडा येथील गोडाउनवर छापा मारुन पुन्हा १९ क्विंटल रेशनचा तांदूळ किंमत ४0 हजार रुपये, असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कलम ३/१८१/१५८/७७ जीवनावश्यक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, उपरोक्त आरोपींना ३0 ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.