लोंबकाळणाऱ्या विजवाहिन्यांनी घेतला राशन दुकानदाराचा बळी; दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 08:41 PM2020-06-04T20:41:38+5:302020-06-04T20:43:39+5:30

विजवाहिन्यांतून करंट टेम्पोत उतरल्याने झाली दुर्घटना

Ration shop owner killed by hanging power lines; Two seriously injured | लोंबकाळणाऱ्या विजवाहिन्यांनी घेतला राशन दुकानदाराचा बळी; दोघे गंभीर जखमी

लोंबकाळणाऱ्या विजवाहिन्यांनी घेतला राशन दुकानदाराचा बळी; दोघे गंभीर जखमी

googlenewsNext

औरंगाबाद : लोंबकाळणाऱ्या वीज वाहिनीचे करंट लागून तीन जण होरपळले या घटनेत राशन दुकानदाराचा अंत झाला तर अन्य दोघे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत . ही घटना गुरुवारी दुपारी हर्सुल परीसरातील एकतानगर येथे घडली . 
राहुल न्यानेश्वर गायके (वय ३४, रा . शिवछत्रपतीनगर , हडको एन १२ ) असे मयताचे नाव आहे .

 याविषयी पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की , राहुल गायके यांचे हर्सुल येथील एकतानगर येथे स्वस्त धान्य दुकान आहे . आज दुपारी त्यांनी ग्राहकांना वाटप करण्यासाठी टेंपोमधून धान्य आणले होते . दुकानात माल उतरविल्यानंतर टेंपोचालक तेथून जाउ लागला . मात्र गल्लीत टेंपो बंद पडला 
 .   टेंपोची बॅटरी नादुरुस्त  असल्यामुळे चालकाने राहुल आणि दुकानाजवळ बसलेल्या अन्य एकाला  टेंपोला मागून धक्का देण्यास सांगितले . यामुळे राहुल आणि अन्य एक जण टेंपोला धक्का देत असताना रस्त्यावरील महावितरणच्या लोंबकाळणाऱ्या वीज वाहिनीला टेंपोच्या लोखंडी टपाचा स्पर्श झाला . यामुळे स्पार्किंग होऊन टेंपोत वीज प्रवाह उतरल्याने राहुलसह दोघांना जोराचा शॉक लागला .नुकताच पाउस झालेला होता आणि राहुल यांनी पायात चप्पल  बुट घातलेला नव्हता यामुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध झाले  .  

टेंपो चालक आणि अन्य एकजणालाही जबर शॉक  लागल्याने त्यांना तात्काळ एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले . अधिक उपचारासाठी राहुल यांना घाटीत दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले . या घटनेची माहिती मिळताच हर्सुल ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले ,पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले ,  सहायक उपनिरीक्षक  सय्यद बाबर आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी तर सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली . याविषयी हर्सुल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली . 

महावितरणकडे अनेकदा तक्रारी
एकतानगरचे माजी नगरसेवक रूपचंद वाघमारे म्हणाले की , एकतानगरमध्ये महावितरणने टाकलेल्या कोटेड वीजवाहिनी अनेक ठिकाणी जोड देण्यात आले आहे . यामुळे परीसरातील वीज  पुरवठा सतत खंडीत होत असल्यामुळे महावितरणच्या  अधिकाऱ्याकडे वीज वाहिनी बदलण्यात यावी याकरीता अनेकदा पाठपुरावा केला . मात्र याची दखल न घेतल्यामुळे आजची घटना घडली . या घटनेमुळे परिसरातील नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला .

Web Title: Ration shop owner killed by hanging power lines; Two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.