रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

By Admin | Published: August 9, 2015 12:17 AM2015-08-09T00:17:34+5:302015-08-09T00:30:01+5:30

रत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने

Ratnagiri-Nagpur National Highway | रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

googlenewsNext


दत्ता थोरे , लातूर
रत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या महामार्गाच्या कामाची ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना काढली असून सक्षम प्राधिकारीपदी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय २०१४ ला ‘टू लेन’ घोषित झालेला हा मार्ग आता नव्या अधिसूचनेनुसार ‘फोर लेन’ करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कामाच्या फक्त चर्चाच व्हायच्या. मुहूर्तच लागत नसलेल्या या कामाला या जूनपासून वेग आला आहे. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या या खात्यातून हे काम होणार असून या मार्गाच्या भूसंपादनासाठी ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना जूनच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातून जेवढा मार्ग जातो, तेवढ्या मार्गासाठी जमीनीचे भूसंपादन करावयासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ एसडीसो शोभा जाधव यांच्याकडे याच्या सक्षम प्राधिकारीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सक्षम प्राधिकारीच्या नियुक्तीनंतर ते आता उस्मानाबाद-लातूरच्या सिमेवरील उजनीपासून ते लातूर-नांदेडच्या सीमेवरील रूईपर्यंतच्या जिल्ह्याच्या हद्दीतील किती जमीन लागेल याचा अभ्यास करणार आहे. या मार्गातील येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ८५ गावातील आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी करुन घेतील. शेती किती जाते ? जागा किती लागते ? फळपिके किती आहेत ? घरे किती आहेत ? त्यांच्या किमतीसह मावेजा ठरविण्यात येणार आहे. अंदाजे या वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील उजनीपासून त्यांना एक वर्षात या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही आता नेमकी किती गावे येणार आहेत ? रस्त्यासाठी किती जमीन लागणार आहे ? किती शेतकरी आहेत ? त्यांना किती मावेजा द्यावा लागणार आहे ? याची माहिती संकलित करीत आहोत. पूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर ती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार मावेजाचे आदेश निघून त्याचे भूसंपादन करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय महामार्गासाठी निघणाऱ्या भूसंपादनाच्या अधिसूचना या ‘थ्री स्मॉल ए’, ‘थ्री कॅपिटल ए’, ‘थ्री डी’ आणि ‘अवॉर्ड’ अशा चार टप्प्यात केल्या जातात. ‘थ्री स्मॉल ए’मध्ये सक्षम प्राधिकारी नियुक्त केला जातो. ‘थ्री कॅपिटल ए’ मध्ये ज्या सर्व्हे नंबरचे भूखंड ताब्यात घ्यावयाचे आहेत त्याचे नंबर घेऊन ते शासनाला कळविले जातात. ही अधिसूचना आता निघायच्या मार्गावर आहे. त्यानंतर ‘थ्रीडी’ मध्ये सर्व्हे नंबरच्या व्यक्तींची नावे घोषित केली जातात आणि ‘अवॉर्ड’ या शेवटच्या टप्प्यात बाधितांना मावेजा दिला जातो. २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये मावेजा मिळणार आहे़
राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा जरी रत्नागिरी ते नागपूर असला तरी सोलापूरपर्यंत एन. एच. ९ हा फोर लेन रस्ता आला आहे. २११ क्रमांकाचा सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या फोर लेनचे काम सुरु आहे. आता फक्त तुळजापूर ते नागपूर या मार्गावरच फोर लेनचे काम करावे लागणार आहे.

Web Title: Ratnagiri-Nagpur National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.