रविवारीही पीकविम्यासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:23 AM2017-07-31T00:23:13+5:302017-07-31T00:23:13+5:30
हिंगोली : पीक विमा भरण्याच्या शेवटच्या दिवशी रविवारीर जिल्हामध्यवर्त्ती बँकेत रात्री उशिरा पर्यंत शेतकºयांकडून पीक विमा भरुन घेतला. मात्र तलाठ्याकडून बहुतांश शेतकºयांच्या सात बारावर झालेली खाडखोड दुरुस्त करण्यास सांगताच शेतकरी बँक कर्मचाºयावर धावून जात होते. त्यामुळे तलाठ्यांची खाडखोड शेतकºयांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

रविवारी जिल्हामध्यवर्त्ती बँकसह इतर बँक व महा- ई सेवा केंद्रावर पीक विमा भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शेतकºयांची गर्दी होती. कोणत्या ठिकणी सर्व्हर धिम्या गतीने सुरु होते तर जिल्हा मध्यवर्त्ती बँकेत मात्र आॅफ लाईन शेतकºयांचा पीक विमा भरुन घेतला जात होता. सर्व पीक विमा भरुन घेतल्यानंतर मुख्यकार्यालयाकडे डाटा पाठविण्यात येणार आहे. नंतर तेथून पूर्ण डाटा आॅनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती बँकेतून मिळाली. विमा भरताना शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून बँक कर्मचारी शेतकºयांच्या कागदपत्राची बारकाईने पाहणी करीत आहेत. यात बºयाच सात बारावर खाडाखोड तर वर्ष बदलले आहे. तर काही शेतकºयांच्या पेरा पत्रकातील गट नंबर, क्षेत्रफळाला खाडाखोड केल्याचे बँक कर्मचाºयांनी सांगताच रांगेत ताटकळत बसलेले शेतकरी कर्मचाºयावर धावून जात होते. तर रागाने तलाठ्याच्या घराचा रस्ता धरत होते. तलाठ्याच्या खाडाखोडीचा शेतकºयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. तर काही शेतकरी पेरा पत्रक न देताच फक्त सात बारावरच पीक विमा भरता येत असल्याचे शेतकºयास सांगत होते.