नंदनवन कॉलनीतील ‘त्या’ खुल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:04 AM2021-06-16T04:04:21+5:302021-06-16T04:04:21+5:30
बिल्डर हाउसिंग सोसायटीत रेखांकनाची खुली जागा आहे. त्यावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात ...
बिल्डर हाउसिंग सोसायटीत रेखांकनाची खुली जागा आहे. त्यावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात कारवाई करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुन्हा पत्रे व लोखंडी अँगल लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी कारवाईचे आदेश दिले. पहाडसिंगपुरा रोडलगत साईबाबा मंदिराजवळ पुंड यांनी नाल्यात आरसीसीमध्ये कॉलम टाकून भिंत बांधण्याचा प्रयत्न केल्याने हे बांधकाम बंद करण्यात आले. पुंड हेच या भागात बारा हजार स्क्वेअर फूट जागेत आरसीसीचे काम करत आहेत. हे कामसुद्धा बंद करून त्यांना मालकी हक्क व बांधकाम परवानगीबाबत नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली, पोलीस पथकाचे तुपे, राजपूत, ठाकरे, पठाण यांच्या पथकाने केली.
सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय बंदच
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय अद्याप बंदच आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. मनपा प्रशासन केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशाची वाट पाहत आहे.
मार्च २०२० मध्ये केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय बंद केले होते. तेव्हापासून म्हणजेच दीड वर्षे उलटल्यानंतरही प्राणिसंग्रहालय बंदच आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने शासन आदेशानुसार शहरातील सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. महापालिकेने शहर बस, उद्याने नागरिकांसाठी खुली केली आहेत. सिद्धार्थ उद्यानात आता गर्दी होत आहे. उद्यानात आलेले अनेक जण प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. पण, प्राणिसंग्रहालयाला कुपूल लावलेले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने यासंदर्भात आदेश दिलेले नाहीत. राज्यातील कोणतेही प्राणिसंग्रहालय सुरू झालेले नाही. आदेश प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.