‘जनता खाना’ जनतेपर्यंत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:25 AM2017-12-26T00:25:29+5:302017-12-26T00:26:21+5:30

: रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.

 Reach the people 'Janatan' to the masses | ‘जनता खाना’ जनतेपर्यंत पोहोचेना

‘जनता खाना’ जनतेपर्यंत पोहोचेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणा-या प्रवाशांसाठी अवघ्या १५ रुपयांत जेवण जनता खानाद्वारे पुरविण्यात येते; परंतु रेल्वेस्टेशनवर ‘जनता खाना’ची माहिती अगदी सहजपणे मिळत नाही. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करून महागडे पदार्थ घेण्याची वेळ अनेक सर्वसामान्य प्रवाशांवर येत आहे.
मॉडेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी कॅन्टीन, फूडप्लाझा आहे. सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ रुपयांत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ‘जनता खाना’ ही योजना सुरू केली. अवघ्या १५ रुपयांत सात पुºया, बटाट्याची भाजी, लोणचे असा मेनू दिला जातो. एका प्रवाशाचे जेवण या जनता खानात सहज होते; परंतु ‘जनता खाना’ या सुविधेची लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात
आहे.
जनता खाना उपलब्ध असल्याची माहिती दर्शनी भागात लावली जात नाही. कधीतरी आणि कुठेतरी कोप-यात फलक दिसतो. तो प्रवाशांना सहज दिसतही नाही. जे प्रवासी मागतील, त्यांनाच जनता खाना देण्याचा कल दिसतो.
जनता खाना उपलब्ध असल्याची कल्पना मिळत नसल्याने खिशाला ताण देऊन महागडे भोजन विकत घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. जनता खाना मागितल्यावर नसल्याचेही अनेकदा सांगितले
जाते. प्रवाशांपर्यंत जनता खाना पोहोचत नसल्याने ते ‘बेचव’ होत आहे.
अधिकारी म्हणतात...
रेल्वेस्टेशनवरील संबंधित अधिका-यांना विचारले असताना ते म्हणाले, ‘जनता खाना’चा प्रचार-प्रसार रेल्वेच्या संकेतस्थळावरून केला जातो. प्रवाशांना त्याविषयी माहिती मिळते. रेल्वेस्टेशनवर मागणी करणाºया प्रवाशांना जनता खाना दिला जातो. यासंदर्भात फलक लावावा, हे बंधनकारक नाही.

Web Title:  Reach the people 'Janatan' to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.