लसीकरणानंतर महिला कर्मचाऱ्याला रिॲक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:05 AM2021-01-17T04:05:21+5:302021-01-17T04:05:21+5:30
औरंगाबाद : लसीकरणानंतर एका महिला कर्मचाऱ्याला रिॲक्शन झाल्याचा प्रकार मनपाच्या एन - ८ येथील केंद्रावर घडला. यावेळी घाबरल्यामुळे गुदमरल्यासारखे ...
औरंगाबाद : लसीकरणानंतर एका महिला कर्मचाऱ्याला रिॲक्शन झाल्याचा प्रकार मनपाच्या एन - ८ येथील केंद्रावर घडला. यावेळी घाबरल्यामुळे गुदमरल्यासारखे महिला कर्मचाऱ्याला वाटत होते. कोणत्याही गंभीर स्वरुपाची रिॲक्शन नसल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
ही महिला कर्मचारी एन - ८ येथील आरोग्य केंद्रातच कार्यरत आहे. लस घेतल्यानंतर ही महिला कर्मचारी काहीशी घाबरली. यावेळी तिने गतीने श्वास घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे केंद्रातील आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तिला तत्काळ जवळील ‘एईएफआय’ केंद्रात हलविले. याठिकाणी तिच्यावर उपचार करून सुट्टी देण्यात आली, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली. जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. गेले काही दिवस लसीकरणानंतर होणाऱ्या रिॲक्शनविषयी चर्चा सुरु होती. परंतु, एन - ८ येथील घटना वगळता अन्य कुठेही असा प्रकार झालेला नाही.