मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
By Admin | Published: May 15, 2014 12:05 AM2014-05-15T00:05:02+5:302014-05-15T00:17:42+5:30
परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे,
परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी एस. पी. सिंह यांनी पत्रपरिषदेत दिली. ते म्हणाले, १६ मे रोजी सकाळी ८ वाजता परभणी येथील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मतमोजणीस प्रारंभ होईल. सर्वप्रथम टपाली मतमोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष फेरीस प्रारंभ होईल. ईव्हीएममधील मतांची मतमोजणी विधानसभा मतदारसंघ निहाय स्वतंत्र सहा हॉलमध्ये व टपाली मतपत्रिकेची स्वतंत्रपणे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे असेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल नियोजित असून २५ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी १०० मतमोजणी पर्यवेक्षक, १०० मतमोजणी सहाय्यक व १०० अतिरिक्त मतमोजणी सहाय्यक यांच्याशिवाय इतर व्यवस्थेसाठी २०० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. फेरीनिहाय मतमोजणी माहिती सर्वांना देण्यासाठी कृषी विद्यापीठातील शेतकरी निवास समोरच्या जागेवर व विद्यापीठ क्रीडांगणावर ध्वनिक्षेपक व प्रोजेक्टरद्वारे तत्काळ माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फेरीनिहाय मतमोजणी निकाल ६६६.स्रं१ुँंल्ल्री’ीू३्रङ्मल्ल२.ूङ्मे वर उपलब्ध असेल. प्रसारमाध्यमांसाठी मतमोजणी ठिकाणी स्वतंत्र मीडिया सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात १०० मीटरपर्यंत वाहनांसाठी प्रवेश निषिद्ध आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी व्यतिरिक्त भारत निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्तींनाच मतमोजणी कक्षामध्ये प्रवेश असेल. (जिल्हा प्रतिनिधी) अशा होतील फेर्या परभणी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा संघनिहाय मतदान केंद्राप्रमाणे मतमोजणीच्या फेर्या निश्चित झाल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान केंद्राची (बुथ) १९७५ होती. प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातील १४ टेबल याप्रमाणे ८४ टेबलवर एकाचवेळी बुथमध्ये पडलेल्या मतदानाची मतमोजणी होईल. ८४ बुथच्या मतदानाची एक फेरी अशा सहा विधानसभा मतदारसंघातील मिळून २५ फेर्या होतील. जिंतूर विधानसभा मतदारसंघात २६, परभणीमध्ये २१, गंगाखेडमध्ये २६, पाथरीमध्ये २६, परतूरमध्ये २३ आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात २३ फेर्या होतील. ११ लाख ५९ हजार ३७५ मतदान परभणी लोकसभा मतदारसंघात ११ लाख ५९ हजार ३७५ मतदान झाले. याशिवाय पोस्टल मतदानासाठी १११० अर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ८९८ जणांनी प्रक्रिया केली. पैकी ७०५ टपाली मतदान प्राप्त झाले आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे १६ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जेवढे टपाली मतदानपत्र मिळतील त्याची मोजणी करण्यात येणार आहे.