खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

By राम शिनगारे | Published: October 13, 2023 10:22 PM2023-10-13T22:22:18+5:302023-10-13T22:22:24+5:30

एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद

Real chaos will begin after the Lok Sabha elections, predicts Kumar Ketkar | खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

खऱ्या अराजकाला लोकसभेनंतर सुरुवात होणार, मोदींनंतर भाजप खिळखिळ होईल- कुमार केतकर

छत्रपती संभाजीनगर : सध्या देशात जो काही प्रकार सुरु आहे. ती केवळ लिटमस टेस्ट आहे. खऱ्या अराजकतेला लोकसभा निवडणूकीनंतर २०२४ साली सुरू होणार आहे. ती अराजकता किती हिंसात्मक असेल हे आताच सांगता येणार नाही, असे भाकितच राज्यसभेतील खासदार तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी वर्तविले.

एमजीएममधील वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत खा. कुमार केतकर यांची खुली चर्चा शुक्रवारी सायंकाळी आयोजित केली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रा. एच.एम. देसरडा, अण्णासाहेब खंदारे, डॉ. स्मिता अवचार, प्राचार्य डॉ. रेखा शेळके आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळी काम करणाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या इस्त्राईल व पेलेस्टाईन प्रकरणात हमास, तालिबान, आयएसआयसारख्या सगळ्या संस्था एकच आहेत. त्यांना ठेचलेच पाहिजे, अशी भाषा केली जात आहे. केंद्र शासनाला कशाही पद्धतीने पुन्हा सत्तेत यायचे आहे.

त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. लोकसभा जिंकण्यासाठी हे सरकार बालाकोट, पुलवामा सारखे छोटेखानी युद्धही देशावर लादू शकते. सध्याचा प्रकार हा केवळ अधिकाधिक आरजकाची पूर्वतयारी असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या जागातील फक्त तीनच देशात ईव्हीएम मशीनवर मतदान होते. त्यात भारताचा समावेश आहे. जेव्हा ईव्हीएम सुरू झाले तेव्हाचे तंत्रज्ञान आणि आताचे तंत्रज्ञान जमीन असमानचा फरक आहे. सध्या भाजपला ५४५ जागांवर ईव्हीएम मॅनेज करावे लागणार नाही. त्यांना सत्तेत येण्यापुरत्या जागा हव्या आहेत. त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातुन ईव्हीएम मॅनेज करतील असेही खा. केतकर यांनी सांगितले.

मोदींनंतर भाजपा खिळखिळ होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरची भाजपा खिळखिळ होईल असा दावा करताना आरएसएस नावाची संघटना बलाढ्य असल्याचे सांगितले जाते. मात्र, तसे काही नाही. या संघटनेची स्थापना १९२५ साली झाली. मात्र, या संघटनेच्या माध्यमातुन जनसंघाच्या काळापर्यंत एकाही राज्यात सत्ता स्थापन करता आलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी सत्ता मिळवली ती इतर पक्षांच्या मदतीनेच मिळवल्याचेही केतकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Real chaos will begin after the Lok Sabha elections, predicts Kumar Ketkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.