वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:38 PM2021-12-10T13:38:22+5:302021-12-10T13:43:04+5:30

कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला.

The reason for the waiting of vehicles came to the fore, due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble | वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

वाहनांच्या वेटिंगचे कारण आले समोर, ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे वाहन उद्योग अडचणीत

googlenewsNext

औरंगाबाद : ‘सिलिकॉन चिप्स’च्या तुटवड्यामुळे औरंगाबादसह जगभरातील वाहन उद्योग अडचणीत सापडले असून या उद्याेगांनी उत्पादनांचे प्रमाण कमी केले आहे (due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble). त्यामुळे सध्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत जाणवत आहे. अनेक वाहनांसाठी ग्राहकांना चार ते पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी ‘चिप्स’च्या तुटवड्याबद्दल सांगितले की, कोरोनामुळे अलीकडे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेकडे प्रत्येक क्षेत्राचा कल वाढला. त्यामुळे जागतिक पातळीवर ‘चिप्स’ची मागणी वाढली आणि अचानकपणे सगळीकडे ‘सिलिकॉन चिप्स’चा तुटवडा निर्माण झाला. जगातील बाजारपेठेत ७५ ते ८० टक्के ‘चिप्स’ तैवान येथील कंपनीची आहे. मागणीच्या तुलनेत या कंपनीची चिप्स उत्पादनाची पुरेशी क्षमता नाही. उत्पादन क्षमता वाढवायची असेल, तर मोठी गुंतवणूक करावी लागते. शिवाय अब्जावधी चिप्स तयार केल्यानंतर त्या बाजारात विकल्या जाव्या लागतात. म्हणून सध्या तरी या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे धाडस कोणी करत नाही; परंतु अलीकडे तैवान, अमेरिका व युरोपमध्ये ‘चिप्स’ निर्मिती उद्योगांच्या विस्तारीकरणास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मार्च २०२२ पर्यंत तरी ‘चिप्स’चा तुटवडा जाणवणारच आहे. येणाऱ्या दिवाळीपर्यंत ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी औरंगाबादसह देशभरात दुचाकी, चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी केली आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या सर्वच कंपन्यांनी उत्पादन क्षमता कमी केल्यामुळे वाहनांसाठी ‘वेटिंग’वर थांबावे लागत आहे.औरंगाबादेत स्कोडा व बजाज या दोनच कंपन्या वाहन उत्पादन करतात. या दोन कंपन्यांनाही ‘सिलिकॉन चिप्स’ची झळ बसली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओमायक्रॉन’ चिंता नाही
कोरोनामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्र विस्कळीत बनले होते. अलीकडे ते हळूहळू पूर्वपदावर आले असून, आता आणखी कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सर्वच उद्योग क्षेत्राच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता, उद्योगांनी ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत माल घेऊन गेलेल्या देशातच कंटेनर अडकून पडले होते. त्यामुळे कच्च्या मालाची आयात व उत्पादनाच्या निर्यातीसाठी कंटेरनची मोठी अडचण उद्योगांना भासली होती. ओमायक्रॉनबद्दल खूप प्रवाद असल्यामुळे उद्योगांवर त्याचा परिणाम होईल, असे दिसत नाही.
- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, ‘सीएमआयए’

Web Title: The reason for the waiting of vehicles came to the fore, due to the shortage of silicon chips in the automotive industry in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.