१५० कोटींचा आता ‘रिकॉल’ गेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:18 AM2017-12-24T01:18:31+5:302017-12-24T01:18:36+5:30
शहरातील ५० रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींच्या निविदा काढल्या. प्रत्येकी २५ कोटींचे काम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटदारही सरसावले. ‘सोयी’चा कंत्राटदार न आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या ‘रिकॉल’गेममध्ये सोयीच्या कंत्राटदारांना कामे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५० कोटींच्या निविदा रिकॉल होणार ही भविष्यवाणी एका मोठ्या कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वीच वर्तविली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ५० रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींच्या निविदा काढल्या. प्रत्येकी २५ कोटींचे काम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंत्राटदारही सरसावले. ‘सोयी’चा कंत्राटदार न आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या ‘रिकॉल’गेममध्ये सोयीच्या कंत्राटदारांना कामे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १५० कोटींच्या निविदा रिकॉल होणार ही भविष्यवाणी एका मोठ्या कंत्राटदाराने दोन आठवड्यांपूर्वीच वर्तविली होती.
दोन वर्षांपूर्वी शासनाने शहरातील सहा रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतील सर्व कामे महापालिकेने एका ‘सोयी’च्या कंत्राटदाराला दिली होती. या कामांमध्ये मनपा अधिकारी व पदाधिकाºयांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा ताव मारला होता. नंतर झालेल्या चौकशीत कोट्यवधींची अनियमितता झाल्याचे उघडही झाले होते. सहा महिन्यांपूर्वी महाराष्टÑ शासनाने १०० कोटींचा निधी मंजूर केला.
या निधीत आणखी ५० कोटी टाकून शहरात ५० रस्ते गुळगुळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १०० कोटींच्या चार आणि डिफर पेमेंटच्या दोन अशा एकूण सहा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या.
इच्छुक कंत्राटदारांनी या कामांवर अक्षरश: उड्या मारल्या. जेव्हा मनपा अधिकाºयांनी कंत्राटदारांनी दाखल केलेली कागदपत्रे बघितली तर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्या कंत्राटदारांनी निविदा भरल्या आहेत, त्यांना निविदा प्रक्रियेतून रद्द कसे ठरवावे, असा प्रश्न अधिकाºयांना पडला. मागील १५ ते २० दिवसांपासून मनपा पदाधिकारी निविदांची कमर्शियल बीड उघडा, निविदा अंतिम करून स्थायी समितीकडे पाठवा, असा आग्रह धरू लागले.
मनपा अधिकारी विविध कारणे दाखवून टाळाटाळ करू लागले. कंत्राटदारांनी हजारोंच्या संख्येने कागद अपलोड केले आहेत, ते काढण्यासाठी आणि तपासण्यासाठी वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, एका मोठ्या कंत्राटदाराने दहा दिवसांपूर्वीच सर्व निविदा रिकॉल होणार, अशी भविष्यवाणी वर्तविली. त्यावर इतर कंत्राटदारांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. शुक्रवारी जेव्हा मनपा अधिकाºयांनी निविदा रिकॉल करण्याचा निर्णय घेतल्यावर स्पर्धेत उतरलेल्या कंत्राटदारांची अक्षरश: झोपच उडाली.
१९ कंत्राटदार अपात्र कसे
मनपाच्या सहा कामांसाठी २१ निविदा मनपाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील दोनच निविदा पात्र आहेत. उर्वरित १९ निविदा अपात्र कशा असू शकतात? कोट्यवधी रुपयांची कामे करणाºया कंत्राटदारांनी डोळ्यात तेल टाकून निविदा भरल्या आहेत. या निविदा अपात्र ठरविल्या तर काहींनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी नमूद केले की, काही फेरनिविदा मंगळवारी प्रसिद्ध होणार आहेत.