पोलीस ठाण्यासमोर वाहने अस्ताव्यस्त लावणाऱ्याची कोण फाडणार पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:41+5:302021-03-06T04:04:41+5:30

औरंगाबाद : शहरातील पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत वाहने पार्किंगची सुविधा असली तरी वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येत असल्याने ...

Receipt of who will tear the vehicle in front of the police station | पोलीस ठाण्यासमोर वाहने अस्ताव्यस्त लावणाऱ्याची कोण फाडणार पावती

पोलीस ठाण्यासमोर वाहने अस्ताव्यस्त लावणाऱ्याची कोण फाडणार पावती

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत वाहने पार्किंगची सुविधा असली तरी वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येत असल्याने त्यांच्यावर पावती फाडणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. जवाहरनगर, पुंडलिकनगर पोलीस ठाण्यासमोर वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्याकडे दुर्लक्ष होत असून, त्यांना मात्र कुणी पावती देत नाही. सामान्यांनी नियम मोडला की, त्याला ऑनलाइन पावती देण्यात देण्यात येते. त्यांच्याकडून दररोजचा दंड वसूल केला जातो; परंतु पोलीस ठाण्याचे कर्मचारी यात अपवाद राहिलेले दिसत आहेत. कोरोना काळात नागरिक आर्थिक विवंचनेत असताना त्यांना रस्त्यावर कळत न कळत दंडाला सामोरे जावे लागत आहे. शहरात छावणी, बेगमपुरा, सिटी चौक, क्रांती चौैक, जिन्सी, सिडको, उस्मानपुरा, जवाहरनगर, सातारा, एमआयडीसी सिडको, एमआयडीसी वाळूज, वाळूज, दाैलताबाद, हर्सुल, मुकुंदवाडी, पुंडलीकनगर , वेदांतनगर असे १८ पोलीस ठाणे असून, चाैक्याची संख्याही अनेक संवेदनशिल भागात देण्यात आलेल्या आहेत.

शहरात एकूण ३७०० च्या जवळपास पोलीस कर्मचारी, अधिकारी संख्या असून, दुचाकी तसेच चार चाकी वाहनाची संख्या ४०० च्या जवळपास आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची स्वत:ची वाहने वेगळीच आहेत. प्रत्येक ठाण्याला स्वत:ची पार्किंग असल्याने वाहने थांबविणे सोयीचे ठरते; परंतु जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याची वाहनांची पार्किंग ही रस्त्यावर होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील नागरिकांना सदरील ठाण्यासमोरून न जात दुसऱ्या रस्त्याचा वापर करावा लागतो.

- शहरात १८ पोलीस ठाणे आहेत

- ३७०० च्या जवळपास पोलीस कर्मचारी

- ४०० च्या जवळपास दुचाकी व चारचाकी वाहने

ऑनलाइन हजारो रुपयांचा दंड वसूल.

सीसीटीव्हीने शहर जोडण्यात आल्याने त्यांचे कंट्रोलींग मुख्यालयात जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्या कोपऱ्यात काय घडले. वाहतुकीत अडथळे आल्यास ई चलनद्वारे वसुली केली जाते; परंतु पोलीस ठाण्यासमोर अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने मात्र यातून सुटलेली आहेत. त्यात पोलीस कर्मचाऱ्यांना दंड झाल्याचे आढळत नाही.

पार्किंगच्या विषयावर अधिकारीदेखील याविषयी सांगत नाहीत. कुणाला दंड झाल्याचे सांगता येत नाही; परंतु सामान्य नागरिकांना मात्र त्याच्या मोबाइलवर दंड लावल्याचा संदेश येऊन धडकतो. त्याला दहा ते पंधरा दिवसांच्या आत दंड भरण्याचे सुचविले जाते. अन्यथा वाहतूक चौकात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून पेंडिंगचाही दंड ई चलनद्वारे वसूल केला जातो. सर्वसामान्याला दंड, मग पोलिसांना का दंड लावत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

ई- चलन प्रक्रिया असल्याने सांगता येत नाही...

वाहतुकीचे नियम सर्वांसाठीच आहेत, वाहतुकीस अडथळा होत असेल तर त्याला दंड लावण्यात येतो. ई चलन प्रक्रियेतून कुणी सुटणार नाही. दररोजच दंडाच्या पावत्या जाऊन धडकत आहेत. जनता चूक मान्य करून त्या ऑनलाइन भरत आहेत. खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय दंडाचा मोघम आकडा सांगता येणार नाही.

- मुकुंद देशमुख, पोलीस अधिकारी.

कॅप्शन...१)जवाहर नगर पोलीस ठाणे पार्किंगला जागा नसल्याने वाहने कुठेही उभी करावी लागत आहेत. अनेकदा या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या रस्त्यावरील वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

२) पुंडलिक नगर पोलीस ठाण्यालादेखील पार्किंग नसल्याने वाहने कुठेही उभी करावी लागतात.

Web Title: Receipt of who will tear the vehicle in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.