घरपट्टी, नळपट्टीची वसुली करा- वरपूडकर

By Admin | Published: June 29, 2017 12:12 AM2017-06-29T00:12:17+5:302017-06-29T00:14:18+5:30

परभणी : शहरातील नळपट्टी व घरपट्टींची गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोठी थकबाकी आहे. ती एक महिन्याच्या आत वसूल करा, अशा सूचना महापौर मीनाताई वरपूडकर यांनी दिल्या.

Reclamation of the house, plunderet - Warpudkar | घरपट्टी, नळपट्टीची वसुली करा- वरपूडकर

घरपट्टी, नळपट्टीची वसुली करा- वरपूडकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील नळपट्टी व घरपट्टींची गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून मोठी थकबाकी आहे. ती एक महिन्याच्या आत वसूल करा, अशा सूचना महापौर मीनाताई वरपूडकर यांनी २८ जून रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत बिल कलेक्टर यांना दिल्या.
शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजूलाला यांच्या अध्यक्षतेखाली महापौरांच्या दालनात बिल कलेक्टर यांची बैठक घेण्यात आली. बैठकीस कर अधीक्षक अलकेश देशमुख, अस्थापनाचे विभागप्रमुख अनंत मोरे, रईस खान, आरेज खान यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये बिल कलेक्टर यांनी प्रत्येक घरी जावून नागरिकांकडून घरपट्टी व नळपट्टी वसूल करावी, ८० टक्के थकबाकी वसूल न केल्यास बिल कलेक्टर यांचा पगार दिली जाणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला. तसेच शहरातील लिकेजची पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

Web Title: Reclamation of the house, plunderet - Warpudkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.