जिल्ह्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:04 AM2021-03-15T04:04:56+5:302021-03-15T04:04:56+5:30

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात दहा वर्षांनंतर प्रथमच गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून शहरात ...

Record production of wheat in the district | जिल्ह्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन

जिल्ह्यात गव्हाचे विक्रमी उत्पादन

googlenewsNext

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात दहा वर्षांनंतर प्रथमच गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून शहरात येणाऱ्या गव्हाला थोडा ब्रेक लागला आहे, तर नवीन ज्वारी काळसर पडल्याने भाव उतरले आहेत.

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. भूजलपातळी वाढली. थंडीही चांगली पडली होती. या पोषक वातावरणामुळे यंदा जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले. मागील दहा वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील गहू मोठ्या प्रमाणात जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला येत आहे. नेवासा, प्रवरासंगम, घोडेगाव, लासूर स्टेशन, वैजापूर, फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद या भागातून दररोज हजार क्विंटल गव्हाची आवक झाली. स्थानिक गहू न निवडलेला १८०० ते २००० रुपये, तर निवडलेला गहू २१०० ते २२५० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला.

याकाळात मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या राज्यातून दररोज पाच हजारपेक्षा अधिक गहू बाजारात विक्रीला येत असे. पण स्थानिक गव्हाची आवक वाढल्याने व्यापारी परराज्यातील गहू कमी प्रमाणात मागवीत आहे. मागील आठवड्यात दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल गहू परराज्यातून आला. २१०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री करण्यात येत होता.

ज्वारीला फटका

अवकाळी पावसाचा यंदा ज्वारीला मोठा फटका बसला आहे. नवीन ज्वारी काळपट पडली आहे. त्यात मागणी घटल्याने भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी कमी झाले आहेत. मागील आठवड्यात १२०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल ज्वारी विकली जात होती.

चौकट

भाजीपाला, आडत बाजार बंदचा आवकेवर परिणाम

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ, भाजीपाल्याचा आडत बाजार ११ मार्चपासून बंद ठेवला आहे. त्याचा परिणाम शहरातील अन्य भाजी मंडईवर दिसून आला. विक्रेत्यांकडे तुरळक भाज्या असल्याचे आढळून आले. लिंबाचे भाव ४० ते ५० रुपयांनी वधारून १०० ते १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत विक्री झाले.

चौकट

भाजीपाला ८ मार्च १४ मार्च

लिंबू ६०-८० रु. १००-१२० रु.

टोमॅटो ३०-४० रु. ३०-४० रु.

पत्ताकोबी ३०-४० रु. ३०-४० रु.

हिरवी मिरची ६०-८० रु. ६०-८० रु.

-------

धान्य

गहू (स्थानिक) १८-२३ रु. १८-२३ रु.

गहू (परराज्य) २१-२४ रु. २१-२४ रु.

ज्वारी १७-३५ रु. १२-३५ रु.

----

लॉकडाऊनमुळे अडचण

आडत बाजार सात दिवस बंद ठेवल्याने व रस्त्यावरही भाज्या विक्री करू देत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विक्रीविना भाजीपाला खराब होत आहे.

अजय चव्हाण, शेतकरी

---

वर्षी धान्य खरेदीची तयारी

मार्च महिना लागला की, वार्षिक धान्य खरेदीचे वेध लागतात. मागील वर्षी अतिपावसामुळे धान्याला लवकर कीड लागली होती.

रागिणी टाकळकर, गृहिणी

Web Title: Record production of wheat in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.