अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसुलीची कारवाई

By Admin | Published: February 21, 2017 10:29 PM2017-02-21T22:29:11+5:302017-02-21T22:31:44+5:30

लातूर :२७ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनामत रकमेचे समायोजन बिल सादर केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसूल करण्यात येत आहे.

Recovery of deposit amount from officials & employees' wages | अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसुलीची कारवाई

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसुलीची कारवाई

googlenewsNext

लातूर : मनपा अस्तित्वात आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी विविध कामांसाठी अनामत रक्कम उचलली. मात्र २७ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनामत रकमेचे समायोजन बिल सादर केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अनामत रक्कम वसूल करण्यात येत आहे.
या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेली अनामत रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे. दरम्यान, ज्यांनी समायोजन बिल सादर केले नाही, त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. परंतु, नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्याने लेखा विभागाने वेतनातून अनामत वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Recovery of deposit amount from officials & employees' wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.