अधिक ाºयांच्या दौºयांसाठी रेल्वेस्टेशनवर चक्क वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:02 AM2017-08-22T01:02:25+5:302017-08-22T01:02:25+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांकडून प्रशासकीय दौºयाच्या नावाखाली देवदर्शन आणि पर्यटन केले जाते. आता दौºयासाठी आल्यानंतर इच्छितस्थळी जाण्याचा वाहन खर्च रेल्वेस्टेशनवरील व्यावसायिकांकडून वसूल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 Recovery on railway station for more tourists | अधिक ाºयांच्या दौºयांसाठी रेल्वेस्टेशनवर चक्क वसुली

अधिक ाºयांच्या दौºयांसाठी रेल्वेस्टेशनवर चक्क वसुली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांकडून प्रशासकीय दौºयाच्या नावाखाली देवदर्शन आणि पर्यटन केले जाते. आता दौºयासाठी आल्यानंतर इच्छितस्थळी जाण्याचा वाहन खर्च रेल्वेस्टेशनवरील व्यावसायिकांकडून वसूल होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रेल्वेस्टेशनवरील काही व्यावसायिकांनी यासंदर्भात ‘लोकमत’कडे कैफियत मांडली.
रेल्वे अधिकाºयांचा दौरा म्हटला की, स्टेशनवरील व्यावसायिकांना धास्ती बसते. कोणती कारवाई होणार नाही, याबरोबर दौºयात जर पर्यटन होणार असेल तर त्यासाठी वाहन खर्चापोटी किती रक्कम द्यावी लागेल, असा प्रश्नही त्यांना पडतो. रेल्वेस्टेशनवर दोन कँटीन, फूड प्लाझा, ज्यूस सेंटर, एक बुक स्टॉल, तीन आॅटोमेटिक तिकीट वेंडिंग मशिन्स आहेत.
याबरोबर इतर स्टॉलही आहेत. दौºयावर येणाºया अधिकाºयाच्या पर्यटनासाठी येणारा वाहन खर्च खासगी व्यावसायिकांकडून वसूल केला जातो. ही रक्कम देण्यास नकार दिला तर नियमाच्या नावाखाली कारवाई करण्याची भीती दाखविली जाते. आतापर्यंत प्रत्येकाकडून थोडीथोडी रक्कम वसूल केली जात होती, त्यामुळे ती सहज देऊन टाकली जाते; परंतु गेल्या काही दिवसांत यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता हे सहन करण्यापलीकडे होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी आणि शिर्डी यामुळे पाहणीच्या नावाखाली बड्या अधिकाºयांची पावले औरंगाबादकडे वळतात. प्रत्येक महिन्याला किमान एका अधिकाºयाचा पाहणी दौरा हमखास असतो. गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांकडून दौºयाच्या नावाखाली देवदर्शन आणि पर्यटन सुरूच आहे. विशेष बोगीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आलेल्या रेल्वे अधिकाºयांनी नुकतीच १३ आॅगस्ट रोजी वेरूळला भेट दिली होती.

Web Title:  Recovery on railway station for more tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.