'७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 06:56 PM2022-09-16T18:56:37+5:302022-09-16T18:58:04+5:30

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली.

'Recruitment of 75 thousand posts in the state'; Announcement of the Chief Minister Eknath Shinde on the occasion of unveiling the statue of Shivaji Maharaj at Dr. babasaheb Ambedkar Marathawada University Aurangabad | '७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

'७५ हजार पदांची भरती होणार'; शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा

googlenewsNext

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्यात येईल, अशी घोषणा केली. 

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ११ फुट उंच अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज सायंकाळी शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी कुलगुरू प्रमोद येवले, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उद्या सामंत, सहकारमंत्री अतुल सावे आदींची उपस्थिती होती. अनावरणानंतर विद्यापीठाच्या नाट्यगृहातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले.

ते म्हणाले, शिवाजी महाराजांचे भोसले घराणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी औरंगाबाद आहे, असा विलक्षण योगायोग आहे. विद्यापीठातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या पुतळ्यातून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहील, असेही ते म्हणाले. 

मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही 
तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कुलगुरू प्रमोद येवले यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही यावेळी दिली. याचवेळी प्रेक्षागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यात लवकरच मंजूर पदांची भरती करण्यात येईल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरीभरती करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. 

Web Title: 'Recruitment of 75 thousand posts in the state'; Announcement of the Chief Minister Eknath Shinde on the occasion of unveiling the statue of Shivaji Maharaj at Dr. babasaheb Ambedkar Marathawada University Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.