विद्यापीठातील ७३ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रस्ताव मागासवर्गीय कक्षाकडे

By योगेश पायघन | Published: December 12, 2022 08:03 PM2022-12-12T20:03:57+5:302022-12-12T20:04:35+5:30

पुढील ३ महिन्यात विद्यापीठात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे 

Recruitment proposals of 73 Assistant Professors in the Dr.BAMU to Backward Class Cell | विद्यापीठातील ७३ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रस्ताव मागासवर्गीय कक्षाकडे

विद्यापीठातील ७३ सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीच्या प्रस्ताव मागासवर्गीय कक्षाकडे

googlenewsNext

औरंगाबाद : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ जागा भरण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. प्रत्येक विभागाला पुर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक मिळून शैक्षणिक कामकाज सुरळीत व्हावे या दृष्टीने विद्यापीठ प्रशानाने नियोजन करण्यात आले. त्यासाठी मंजुर ७३ पदे सहाय्यक प्राध्यापकांची भरल्या जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव 'मावक' अर्थात मार्गासावर्गीय कक्षाकडे पाठवण्यात आला आहे. पुढील ३ महिन्यात ही भरती प्रक्रीया होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विषयांच्या अध्यापकांच्या २८९ जागा आहेत. त्यापैकी १५२ जागा भरलेल्या असून, १३६ जागा रिक्त आहे. २०१७ पासून भरतीवरील निर्बंधामुळे रिक्त पदे भरता येत नव्हती. त्यावेळीच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यासंबंधी निर्णय झाल्याने आता पूर्णवेळ ७३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. ८० टक्के म्हणजे, २१७ जागा भरलेल्या असाव्यात. त्यासाठी ७३ जागांवर भरतीची गरज आहे. त्या जागा भरण्यासाठी विद्यापीठाला परवानगी मिळाली. प्रत्यक्ष पदभरतीची जाहिरात कधी निघते, याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे.

५४ सीएचबी, ३० कंत्राटी प्राध्यापक
रिक्त जागांमुळे ५४ विभागात तासिका तत्त्वावर (सीएचबी) सहायक प्राध्यापकपदी २८४ जागा भरण्यासाठी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. रिक्त जागांवर भरती करण्यास निर्बंध असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ फंडातून चालू शैक्षणिक वर्षांत १० महिन्यांसाठी असलेल्या या सहायक प्राध्यापकांच्या कंत्राटी स्वरूपात ३७ पैकी ३० जागांवर सहायक प्राध्यापक नेमले.

संवर्गवार आरक्षणानुसार प्रक्रीया
ही पदभरती आता संवर्गवार आरक्षणानुसार प्रक्रीया असणार आहे. सुधारित आकृतिबंधाची निश्चितीची प्रक्रीया झालेला नाही. पदनाम, पदश्रेणी, वेतनश्रेणी बदलासंदर्भात न्यायालयाची सुनावणी सुरू आहे. त्याच्या निकालानंतर राज्य शासन सुचना देईल. त्यानुसार पुढील आकृतिबंधाची प्रक्रीया होईल.

पुढील ३ महिन्यात भरणार पदे
सध्या शिक्षकांची १३६ पदे रिक्त आहेत. तर ३५१ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. राज्य शासनाने ७३ पदे भरण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी सर्व विभागांचे काम सुरळीत चालावे, मनुष्यबळाची उपलब्धता व्हावी यादृष्टीने सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरण्याचे नियोजन करून प्रस्ताव मावक कडे पाठवला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर पुढील ३ महिन्यात तातडीने ही भरती प्रक्रीया राबवू.
- डॉ. भगवान साखळे, कुलसचिव

शिक्षकेतर कर्मचारी पदे
मंजुर पदे -भरलेली पदे -रिक्त पदे
वर्ग १ -१४ -९ -५
वर्ग २ -५४ -२३ -३१
वर्ग ३ -४७ -३२ -१५
वर्ग ४ -२४९ -१२३ -१२६
एकूण -७७७ -४२६ -३५१

शिक्षकांची पदे
प्राध्यापक -३५ -५ -३०
सह. प्राध्यापक -८० -३६ -५५
सहा प्राध्यापक -१७४ -१११ -६३
एकूण -२८९ -१५२ -१३६

Web Title: Recruitment proposals of 73 Assistant Professors in the Dr.BAMU to Backward Class Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.