जिल्ह्याच्या लाल दिव्याचा वनवास आज संपणार..
By Admin | Published: July 8, 2016 12:26 AM2016-07-08T00:26:25+5:302016-07-08T00:38:37+5:30
!ंलातूर : कायम राज्याच्या नाहीतर केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान असणाऱ्या लातूर जिल्ह्याचा मंत्रिमंडळाचा वनवास संपण्याची चिन्हे आहेत.
!ंलातूर : कायम राज्याच्या नाहीतर केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान असणाऱ्या लातूर जिल्ह्याचा मंत्रिमंडळाचा वनवास संपण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांच्या शिवाय आ. सुधाकर भालेराव यांचेही नाव स्पर्धेत होते. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रुपाने गेल्या दोन वर्षांपासून लाल दिव्यापासून वंचित असलेल्या जिल्ह्याचा वनवास संपण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातून भाजपाचे निवडून आलेले दोन्ही आमदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खास गोटातील म्हणून ओळख असलेले आहेत. राज्यावर असलेला नागपुरी पगडा पाहता दोघांपैकी एकाला मंत्रीपदाची आस आहे. त्यात मराठवाड्यातील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वावर रोखण्याच्या इराद्याने आ. संभाजीराव पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता वाढली आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ बँकेने ऐन निवडणुकीत आ. संभाजीराव पाटील यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पुरुन उरलेल्या संभाजीरावांनी पंकजा यांच्या मनसुब्याला धक्का देऊन विक्रमी मताधिक्य घेतले. पंचायत राज समितीचे अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची महाराष्ट्राला चुणूक दाखविली. राज्यभर जिल्हानिहाय दौरे करुन शिस्तबध्द काम करीत नेतृत्वाच्या कसोटीला खरे उतरले आहेत. पंचायत राज अभियानातील अधिकाऱ्यांना धडकी भरेल असा दम देत आपला दबदबा वाढविला. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)