प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 12:47 PM2022-06-14T12:47:16+5:302022-06-14T12:48:44+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेला आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले.

Redesign the ward; Former MP Chandrakant Khaire's demand surprised political circles | प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य

प्रभाग आराखडा नव्याने करा; माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या मागणीने राजकीय वर्तुळात आश्चर्य

googlenewsNext

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेला प्रभाग आराखडा शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत पोषक असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच, सोमवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रभाग आराखडा नव्याने तयार करा, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सोमवारी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्तांना खैरे यांनी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेचा प्रभाग प्रारूप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाले आहे. हा प्रारूप आराखडा रद्द करून नव्याने तयार करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. मनपाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आराखडा गुगल अर्थच्या साह्याने तयार करण्यात आला. 

नकाशावर प्रगणक गटांच्या सीमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात, प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात, नकाशावर शहरातील महत्त्वाची ठिकाणे रस्ते, नद्या-नाले, रेल्वे लाईन आदी स्पष्टपणे दर्शवावे, नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात, नकाशांचा आकार, त्यावर दर्शवलेले प्रगणक गटांचे क्रमांक, लोकसंख्या आदी तपशील वाचता येईल, असा व नकाशे हाताळता यावेत, यासाठी दोन किंवा तीन भागांत तयार करावेत. तसेच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा करावा, त्याच्या हद्दी स्पष्टपणे दर्शवण्यात याव्यात, प्रत्येक प्रभागात समाविष्ट झालेले प्रगणक गट एकच आहेत, याची खात्री करावी आदी बाबी नमूद आहेत.

चौकशी समिती तरी नेमावी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले. या संदर्भात संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तशीच उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आ. किशनचंद तनवाणी, ॲड. आशुतोष डंख उपस्थित होते.

Web Title: Redesign the ward; Former MP Chandrakant Khaire's demand surprised political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.