रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:01 AM2017-09-19T01:01:21+5:302017-09-19T01:01:21+5:30

संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सा महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जात आहे.

Reflexology week start | रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहास प्रारंभ

रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहास प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सा महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जात आहे. शहरात अ‍ॅक्युप्रेशर ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, नेचर केअर थेरपिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित या सप्ताहाचे सोमवारी गजानन महाराज मंदिर येथील गजानन हॉलमध्ये उद््घाटन झाले. या महाअभियानांतर्गत शहरातील ३३ केंद्रांवर सर्व चिकित्सक प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सा सेवा देत आहेत.
दोन वर्षांपूर्वी या महाअभियानास ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे अभियान संपूर्ण देशात २४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या नि:शुल्क सेवा सप्ताहाचे उद््घाटन सोमवारी झाले. याप्रसंगी व्यासपीठावर आ. अतुल सावे, लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद रॉयलचे अध्यक्ष ओमप्रकाश अग्रवाल, मनोज बोरा, पारस ओस्तवाल, ललित गांधी आणि संयोजक जेआर अनिल जैन यांची उपस्थिती होती.
यावेळी आ. सावे म्हणाले, अनेकांना औषधांचा साइड इफेक्ट होतो. अशावेळी रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर उपचार पद्धती महत्त्वाची ठरते. शहरातील नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा. जेआर अनिल जैन म्हणाले, औषधमुक्त जीवन जगण्यासाठी ही उपचार पद्धती महत्त्वपूर्ण ठरत आहे. शरीरातील अवयवांचे प्रतिबिंब केंद्र जे की, हात-पाय, कान व चेहºयावर आहे. त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार केले जातात, असे ते
म्हणाले. याप्रसंगी नीलेश कांकरिया, विकास पाटणी, आनंद दुग्गड, प्रभा देसरडा, मनोज बाकलीवाल आदींसह चिकित्सकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उद््घाटनानंतर अनेकांनी या उपचार पद्धतीचा लाभ घेतला.
शरीरातील हात-पाय, कान व चेहºयावर रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशर उपचार पद्धतीत त्यांना विशेष प्रकारचा दबाव देऊन उपचार केला जातो. भारतीय जीवन पद्धतीचे विकसित रूप रिफ्लेक्सोलॉजी अ‍ॅक्युप्रेशरसंदर्भात स्थानिक स्तरापासून विश्वस्तरापर्यंत जागरुकता झाली आहे. अनेक संस्थांच्या सहकार्याने सप्ताहातील प्रत्येक दिवशी दोन तास नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात गरजूंवर उपचार होतील.

Web Title: Reflexology week start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.