गतिमान प्रशासनासाठी प्रादेशिक कार्यालये
By Admin | Published: October 5, 2016 01:04 AM2016-10-05T01:04:03+5:302016-10-05T01:17:08+5:30
औरंगाबाद : वीज ग्राहकांना गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण कंपनीने नवनिर्मित प्रादेशिक कार्यालयांची निर्मिती केली आहे.
औरंगाबाद : वीज ग्राहकांना गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण कंपनीने नवनिर्मित प्रादेशिक कार्यालयांची निर्मिती केली आहे. महावितरण कंपनीच्या विभाजनासाठी ही कार्यालये नाहीत, असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले.
औरंगाबाद प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या कोनशीलेच्या अनावरणानंतर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ.संदीपान भुमरे, मुख्य अभियंता तथा प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर, जळगाव परिमंडळाचे मुुख्य अभियंता जिजोबा पारधी, नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता रामदास कांबळे, लातूर परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता डी. डी. हामद, महापारेषणचे मुख्य अभियंता गणपत मुंडे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महावितरणची सेवा अधिक लोकाभिमुख होण्यासाठी व स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत ठिकाणी ग्राम विघुत सेवक नेमण्यात येणार आहेत. यासाठी राज्यात २३०० ग्राम विघुत सेवक लवकरच नेमणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी प्रादेशिक कार्यालयामुळे नवीन वीज जोडण्या व जळालेले ट्रान्सफार्मर स्थानिक पातळीवर लवकर मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.