८८०० व्यापाºयांची जीएसटीनुसार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:57 PM2017-08-03T23:57:59+5:302017-08-03T23:57:59+5:30
भारत सरकारद्वारे एकच करप्रणाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती केली जात आहे़ नांदेड विभागात पूर्वीचे ७००० करदाते आणि नव्याने १८०० करदात्यांनी नोंदणी केली आहे़ ग्रामीण तसेच सिमावर्ती भागात इंटरनेट व तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीस विलंब होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भारत सरकारद्वारे एकच करप्रणाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती केली जात आहे़ नांदेड विभागात पूर्वीचे ७००० करदाते आणि नव्याने १८०० करदात्यांनी नोंदणी केली आहे़ ग्रामीण तसेच सिमावर्ती भागात इंटरनेट व तांत्रिक बिघाडामुळे नोंदणीस विलंब होत आहे़
१ जुलैपासून जीएसटीच्या संकेतस्थळावर व्यापाºयांकडून नोंदणी केली जात आहे़ नांदेड विभागाअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे़ आजपर्यंत या चार जिल्ह्यात दोन्ही विभागात मिळून १८०० व्यापाºयांनी नव्याने नोंदणी केली़ यापुर्वीचे व्हॅट भरणारे जवळपास सात हजार व्यापाºयांचे जीएसटी नोंदणीचे काम कार्यालयाने पूर्ण केले़ नव्याने नोंदणी केलेल्या व्यापाºयांमध्ये सर्वाधिक कापड व्यापारी, ट्रान्सपोर्ट, सर्व्हीस प्रोवायडर, साखर व्यापारी, फोटोग्राफर, सलून, पार्लर, ट्रॅव्हल्स आदींचा समावेश असल्याचे विक्रीकर अधिकारी माधव पुरी यांनी सांगितले़
दरम्यान, जीएसटीसाठी व्यापाºयांना आॅनलाईन नोंदणी करून परवाना काढावा लागत आहे़ ग्रामीण भागात तसेच सीमावर्ती तेलंगना, आंध्रप्रदेशलगत असलेल्या जिल्ह्यातील भोकर, किनवट, बिलोली आदी तालुक्यातील ग्रामीण भागात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ परंतु, येणाºया अडचणी सोडविण्यासाठी वस्तू व सेवाकर कार्यालयातील यंत्रणा तत्पर आहे़
त्याचबरोबर मुंबई कार्यालयातील अधिकाºयांची टीम नांदेडच्या बहुतांश व्यापाºयांना येणाºया अडचणीसाठी फोनद्वारे मार्गदर्शन करीत आहेत़
नोंदणी करताना काही चुका झाल्या तर त्यासंदर्भात लगेचच संबंधी व्यापारी, दुकानदाराशी कार्यालयामार्फत संपर्क करून दुरूस्त करण्यास सांगितले जाते़ त्याचबरोबर ज्या व्यापाºयाकडे दोन पॅन कार्ड आहेत, आधार लिंक केलेले नाही अशा अडचणी सोडवून त्यांची नोंदणी करून दिली जात असल्याचे विक्रीकर अधिकारी पुरी यांनी सांगितले़