अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:26 AM2017-11-09T00:26:19+5:302017-11-09T00:26:41+5:30

जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़

Regrets Committee Members Regarding Irregularities | अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

अनियमिततेवर समिती सदस्यांचा संताप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या सदस्यांनी पहिल्याच दिवशी शासनाच्या विविध योजनांमधील कोट्यवधी रुपयांच्या अनियमिततेवरून जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले़ या समितीच्या सदस्यांना उत्तरे देताना अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे पहावयास मिळाले़
महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायतराज समिती बुधवारपासून जिल्हा दौºयावर आली आहे़ आ़ सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत पहिल्या दिवशी २५ पैकी १४ आमदार दाखल झाले़ काही आमदार मंगळवारी रात्रीच परभणीत आले होते तर काही आमदार बुधवारी सकाळी शहरात दाखल झाले़ सकाळी १० वाजता शहरातील सावली विश्रामगृह येथे नियोजित कार्यक्रमानुसार स्थानिक आमदारांशी समितीचे सदस्य चर्चा करणार होते़ त्यानुसार चर्चेसाठी जिल्ह्यातील आमदारांपैकी केवळ आ़ विजय भांबळे हेच उपस्थित होते़ यावेळी भांबळे यांनी जि़प़ चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कामकाजातील अनियमिततेचा पाडाच वाचला़ शौचालय उभारणी अंतर्गत त्यांनी नियमबाह्यरित्या वितरित केलेल्या निधी प्रकरणी त्यांना निलंबित करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली़ खोडवेकर यांची चौकशी पूर्ण होवूनही अद्याप या प्रकरणी कारवाई झालेली नाही़ त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा, असेही भांबळे म्हणाले़ तसेच शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या संदर्भातही त्यांनी तक्रारी केल्या़ गरुड या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत़ पदाधिकारी, सदस्यांना समाधानकारक उत्तरे देत नाहीत़ शिक्षकांच्या बिंदू नामावलीत व नियुक्त्यांमध्ये त्यांच्या काळात अनियमिता झाली़ ई-लर्निंग अंतर्गत संगणक खरेदीतही गैरप्रकार झाले, अशीही तक्रार यावेळी आ़ भांबळे यांच्यासह काही सदस्यांनी केली़ यावेळी समितीचे प्रमुख आ़ पारवे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले़ त्यानंतर समितीने जि़प़च्या पदाधिकाºयांशी चर्चा केली़ यावेळी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्ष भावनाताई नखाते, राकाँचे गटनेते अजय चौधरी, सभापती श्रीनिवास मुंडे, राधाबाई सूर्यवंशी, उर्मिला बनसोडे, अशोक काकडे आदींची उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी शिक्षकांच्या रिक्त जागा, अधिकाºयांची रिक्त पदे आदी भरण्याची मागणी केली़ त्यानंतर समितीचे सदस्य सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी दाखल झाले़
जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ७़३० पर्यंत बैठक झाली़ या बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला़ २००८-०९ व २०११-१२ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील त्रुटींच्या मुद्यांवर त्यांनी अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ २०११-१२ मध्ये लघुसिंचन विभागात विविध कामांमध्ये १ कोटी ४१ लाख २७ हजार ४७४ रुपयांची अनियमितता झाल्याबाबत त्यांनी जाब विचारला़ तसेच पाणीपुरवठा विभागात ३ कोटी १० लाख ४५ हजार ५९६ रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणातही त्यांनी अधिकाºयांना प्रश्न विचारले़ तसेच बांधकाम विभागात तब्बल ७ कोटी ८५ लाख ८६ हजार ४४८ रुपयांची अनियमितता २०११-१२ या एकाच वर्षात झाल्याबद्दल त्यांनी या विभागाच्या अधिकाºयांनाही धारेवर धरले़
शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार, गणवेश वाटप, डेस्क खरेदी आदींमध्ये ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्या प्रकरणात त्यांनी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना उत्तरे विचारली़ यावर गरुड यांना उत्तरे देताना नाकी नऊ येत होते़ आरोग्य विभागातील अनियमिततेचा विषयही यावेळी चर्चेला आला़ विषय पत्रिकेत या अनियमितेवर चर्चा झाल्यानंतर अनेक प्रकरणे निकाली काढण्याऐवजी समितीच्या सदस्यांनी संबंधित अधिकाºयांना साक्षीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे अधिकारी चांगलेच घामेघूम झाले होते़

Web Title: Regrets Committee Members Regarding Irregularities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.