खुनाच्या गुन्ह्यात नियमित जामीन अर्ज रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:03 AM2021-02-13T04:03:51+5:302021-02-13T04:03:51+5:30
त्याच्या जामीन अर्जास सरकारतर्फे लोकअभियोक्ता कैलास पवार खंडाळकर यांनी विरोध केला. चरणसिंग हरसिंग गुसिंगे (३१, रा. जोडवाडी, ...
त्याच्या जामीन अर्जास सरकारतर्फे लोकअभियोक्ता कैलास पवार खंडाळकर यांनी विरोध केला.
चरणसिंग हरसिंग गुसिंगे (३१, रा. जोडवाडी, ता. जि. औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील संजय बिमरोट, मदन मुन्नासिंग जारवाल, संयज रायसिंग सत्तावन, विजय रायसिंग सत्तावन, संतोष कडू गुसिंगे आणि बिजूसिंग जारवाल असे सहाजण एका कारमध्ये फिर्यादी चरणसिंग यांच्या गल्लीत आले होते. त्यांनी फिर्यादीचा चुलत भाऊ संजय रामचंद्र गुसिंगे याला घराबाहेर बोलावून शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीमध्ये आले असता आरोपींनी त्यांनादेखील मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादीचे वडील हरसिंग काळू गुसिंगे (६०) हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनादेखील मारहाण केली. मदन जारवाल याने हरसिंग गुसिंगे यांच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे फिर्यादीचे वडील बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.