नियमित जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:04 AM2021-06-20T04:04:46+5:302021-06-20T04:04:46+5:30
------------------------------------------------------ ८४५ ग्रॅम सोने परस्पर विक्री करणाऱ्याला जामीन नाकारला औरंगाबाद : दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्पर ...
------------------------------------------------------
८४५ ग्रॅम सोने परस्पर विक्री करणाऱ्याला जामीन नाकारला
औरंगाबाद : दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सोन्यापैकी ८४५ ग्रॅम सोने परस्पर विक्री करून, एलएमएस ज्वेलर्सची तब्बल ४० लाख १८ हजारांची फसवणूक करणारा कारागीर अमरचंद प्रेमराज सोनी याचा नियमित जामीन अर्ज मुख्य न्यायादंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शनिवारी फेटाळला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.
----------------------------------------------------------------------
५६ लाखांची फसवणूक करणाऱ्याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला
औरंगाबाद : भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या गॅस एजन्सीचा परवाना आणि डीलरशिप देण्याचे जाहिरातीद्वारे आमिष दाखवून उद्योजकाची ५६ लाखांची फसवणूक करणारा मुख्य आरोपी नितीश कुमार जितेंद्र प्रसाद सिंग याचा नियमित जामीन अर्ज मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी शनिवारी फेटाळला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.
---------------------------------------------------
२५ लाखांची फसवणूक करणाऱ्याला पोलीस कोठडी
औरंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारून, फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करून शिक्षकाची २५ लाखांची फसवणूक करणारा दिलशाद जहा ईमदाद जहा याला २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी दिले. सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
------------------------------------------------------------
मारहाणीच्या गुन्ह्यात तिघा आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला
औरंगाबाद : प्रकरण न्यायप्रविष्ठ असलेल्या जमिनीच्या वादातून दोघा भावांना जातीवाचक शिवीगाळ करून, सळई व काठीने जबर मारहाण करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात ज्ञानदेव अण्णासाहेब मुळे, सोपान नानासाहेब म्हस्के आणि जनार्दन बापू गिरगे यांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला. सरकारतर्फे सहायक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी काम पाहिले.
------------------------------------------------------------------