शहरात अधूनमधून रिमझिम सरी
By Admin | Published: June 21, 2016 01:07 AM2016-06-21T01:07:38+5:302016-06-21T01:11:49+5:30
औरंगाबाद : अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारपासून औरंगाबादेत पावसाचे सुखद आगमन झाले. रविवारपाठोपाठ सोमवारीही दिवसभर अधूनमधून
औरंगाबाद : अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारपासून औरंगाबादेत पावसाचे सुखद आगमन झाले. रविवारपाठोपाठ सोमवारीही दिवसभर अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६.८५ मि. मी. पाऊस झाला आहे.
भीषण दुष्काळानंतर यंदाही गेल्या दहा दिवसांपासून मान्सून हुलकावणी देत होता. अखेर रविवारी पहाटे अचानक तो दाखल झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या. सोमवारी तर दिवसभरात काही वेळ सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर आकाशात ढग दाटलेले होते.
सकाळी काही भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभर सर्वत्र अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी बरसतच होत्या. या पावसाचा शहरातील जनजीवनावर परिणाम जाणवला. या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.
जिल्ह्यात झालेला पाऊस
औरंगाबाद तालुक्यात १२.४० मि. मी. , फुलंब्री ५.७५ मि. मी., पैठण १२.३० मि. मी., सिल्लोड ८.७५ मि. मी. , सोयगाव ८.३३ मि. मी. , कन्नड ४.८८ मि. मी. , वैजापूर २.८० मि. मी. , गंगापूर ३.७८ मि. मी. , खुलताबाद २.६७ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.