सिडको अधिसूचित क्षेत्रातील ५७५ भुखंडांच्या नियमबाह्य नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:34 PM2019-04-13T22:34:17+5:302019-04-13T22:34:26+5:30

नियमबाह्यपणे ५७५ भुखंडांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी घेतल्याप्रकरणी वडगाव-बजाजनगरच्या सरपंचासह १३ सदस्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

 Regulatory Regulations for 575 Plots in Notified Area of CIDCO | सिडको अधिसूचित क्षेत्रातील ५७५ भुखंडांच्या नियमबाह्य नोंदी

सिडको अधिसूचित क्षेत्रातील ५७५ भुखंडांच्या नियमबाह्य नोंदी

googlenewsNext

वाळूज महानगर : नियमबाह्यपणे ५७५ भुखंडांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी घेतल्याप्रकरणी वडगाव-बजाजनगरच्या सरपंचासह १३ सदस्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकºयांकडे देण्यात आला आहे. या अहवालावर काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वडगाव व साजापूर या गावातील अनेक भुखंडाच्या नोंदी ग्रामपंचायतीने नियबाह्यपणे घेतल्याची तक्रार जि.प.सदस्य रमेश गायकवाड व वडगावचे योगेश साळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. गटविकास अधिकारी एम.सी.राठोड यांनी विस्तार अधिकाºयांचे पथक पाठविले होते. या चौकशीत सरपंच उषा साळे, ग्रामसेवक विलास कचकुरे यांनी १३ सदस्यांच्या मदतीने २६ सप्टेंबर २०१८ च्या मासिक सभेत नियम डावलून ५७५ भुखंडाच्या नोंदी घेतल्याचे उघड झाले आहे.

सदरील ५७५ भुखंड व फेरफारच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या नमुना नंबर ८ अ वर घेऊन अनियमितता केल्याचे चौकशीत उघड झाले होते. या चौकशी अहवालात सरपंच उषा साळे, तत्कालीन ग्रामसेवक विलास कचकुरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गरड, महेश भोंडवे, चंदाबाई काळे, वैशाली जिवरग,अरुण वाहुळे, रमाकांत भांगे, मोहन गिरी, अलका शिंदे, सुरेखा लगड, संगीता कासार, मंदा भोकरे, श्रीकांत साळे, उषा हंडे आदींना दोषी ठरविण्यात आले आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकाºयांकडे हा अहवाल सादर केला आहे. या अहवालावर पुढे काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


पदाधिकारी सापडले अडचणीत
सिडको अधिसूचित क्षेत्रातील वडगाव, तीसगाव, रांजणगाव, साजापूर, करोडी, जोगेश्वरी, वाळूज, शेकापुर आदी ठिकाणी काही लोकांचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांना हाताशी धरुन भुखंड व घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. नियमाबाह्य भूखंडांच्या नोंदी घेतल्याप्रकरणी वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अडचणीत सापडले आहे.

Web Title:  Regulatory Regulations for 575 Plots in Notified Area of CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज