बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी; दीड वर्षात उभारणार नवे ‘सीबीएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 07:27 PM2019-07-05T19:27:32+5:302019-07-05T19:29:37+5:30

मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सीबीएस) पुनर्बांधणीसाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरूझाली आहे.

Rehabilitation of bus station will be done; New 'CBS' will built in 18 months | बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी; दीड वर्षात उभारणार नवे ‘सीबीएस’

बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी; दीड वर्षात उभारणार नवे ‘सीबीएस’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘बसपोर्ट’कडेही लागले लक्ष९ जुलै ते ६ आॅगस्टदरम्यान निविदा मागविण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सीबीएस) पुनर्बांधणीसाठी अखेर निविदा प्रक्रिया सुरूझाली आहे. ९ जुलै ते ६ आॅगस्टदरम्यान निविदा मागविण्यात आल्या आहेत. ७ आॅगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर १८ महिन्यांत बसस्थानकाची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

राज्यातील बहुतांश बसस्थानके  जुनी झाली आहेत. यातील क ाही बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाचाही समावेश आहे. मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. आजघडीला बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अत्याधुनिक बसस्थानकाची औरंगाबादकरांना प्रतीक्षा लागली आहे. याठिकाणी बसपोर्ट बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु आता केवळ नव्याने बसस्थानकाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. जवळपास ४.६ एक र जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक  उभारले जाणार आहे. वरिष्ठ कार्यालयाने यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिली आणि बसस्थानकाचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया सुरू केली.  निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

या सुविधा राहणार
नव्या मध्यवर्ती बसस्थानकात २८ प्लॅटफ ार्म राहणार आहेत. याठिकाणी तिक ीट आरक्षण क ार्यालय, वाहतूक  नियंत्रण क ार्यालय, पार्सल कक्ष, महिलांसाठी हिरक णी क क्ष, शिवशाही, शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी वातानुकू लित क क्ष असतील. जेनेरिक  मेडिक ल स्टोअर्स, खुले उपाहारगृह, चित्रपटगृह आदी सोयीसुविधाही उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बसपोर्टची प्रक्रिया मुंबईतून
मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी २०१६ मध्ये बसपोर्ट बांधण्याची घोषणा झाली. यासाठी बसपोर्टचा नकाशा तयार करण्यात आला आहे. मात्र, या कामासाठी तीन वेळा निविदा काढूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. याठिकाणी बसपोर्ट बांधायच्या निविदेला येथून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने आता सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Rehabilitation of bus station will be done; New 'CBS' will built in 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.