सिल्लोड येथे महसूल विभागाला माहिती न देता पाणी सोडल्याने अभियंत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 07:14 PM2017-12-20T19:14:22+5:302017-12-20T19:14:49+5:30
महसूळ विभागाला न कळवता केळगाव मध्यम प्रकल्पातुंन पाणी सोडल्याने पाटबंधारे उपविभागाच्या तीन अधिका-यांविरोधात तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात पाणी टंचाई असताना शेतीसाठी पाणी सोडलेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सिल्लोड (औरंगाबाद) : महसूळ विभागाला न कळवता केळगाव मध्यम प्रकल्पातुंन पाणी सोडल्याने पाटबंधारे उपविभागाच्या तीन अधिका-यांविरोधात तहसिलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात पाणी टंचाई असताना शेतीसाठी पाणी सोडलेचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सिल्लोड महसूल प्रशासनाने तालुक्यातील भविष्यकालीन पाणी टंचाईच्या दृष्टीने उपाययोजना केली आहे. यामुळे महसूल प्रशासनास अंधारात ठेवत पाठबंधारे विभागाने पाणी सोडणे अवैध ठरवत तहसिलदारांनी तीन अधिका-यांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यात औरंगाबाद पाटबंधारे उपविभागाचे कार्यकारी अभियंता पी.पी.संत, पाटबंधारे सिल्लोड उपविभागाचे उपविभागीय अभियंता के.वाय.पटेल, शाखा अभियंता पी.सी.राठोड यांच्या विरोधात क्रिमिनल प्रोसिजर कलम 107 नूसार फौजदारी कारवाई करित तिघांना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामार्फत नोटीस देण्यात आल्या आहे.
30 नोव्हेंबर रोजी सोडले होते पाणी...
पाणी वाटप संस्थेने मागणी केल्यामुळे प्रकल्पातून अवैधरित्या पाटाद्वारे पाणी सोडले होते. तहसिलदारानी पाणी टंचाई असल्याने प्रकल्पा मधून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटिस देवून पाबंद केले होते. याशिवाय प्रकल्पातिल सर्व विजेच्या डिप्यां बंद केल्या होत्या.एकी कड़े प्रकल्पातुंन पाणी उपसा बंद करुण त्याच प्रकल्पातुंन कालव्या खालील शेतकऱ्यां साठी कालव्या द्वारे पाणी सोडल्या मुळे गावक-यांनी याचा विरोध केला होता.
प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर तहसीलदार संतोष गरड यांनी बंदी केली होती. यासाठी त्यांनी पाणलोट क्षेत्रातील शेतक-यांना नोटीसा देऊन वीज बंद केली होती. तरीही 30 नोव्हेंबरला रात्री प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील ३०० ते ४०० शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांना दिड तास डांबून ठेवले होते. तसेच त्यांनी याची माहिती तहसिलदारांना दूरध्वनीद्वारे दिली. यावर तात्काळ उपाय योजना करत तहसिलदारांनी एक तासात पाणी बंद केले होते. याप्रकरणावरून पाटबंधारे विभाग व महसूल विभागात चांगलीच जुंपली आहे.
केळगाव प्रकल्पातच पाणीसाठा
तालुक्यात आगामी काही दिवसात पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह आहेत. भविष्यात केळगाव प्रकल्प सिल्लोड शहरासह तालुक्याची तहान भागवू भागवु शकतो यामुळे यातून शेतीसाठी पाणी सोडू नये अशा सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या. त्यांनी याचा विचार न करता अवैधरीत्या पाणी सोडले आहे.
- संतोष गोरड, तहसीलदार
नियमानुसार पाणी सोडले
माझ्या अधिकारात वर्तमान पत्रात जाहिरात देऊन वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशाने शेतीसाठी प्रकल्पातुंन पाणी सोडले होते. बेकायदा पाणी सोडले नाही. - पी. सी. राठोड, शाखा अभियंता