पेन्शनधारकांना दिलासा; घरबसल्या मोबाईल ॲपवर काढा हयातीचा दाखला

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 21, 2023 01:23 PM2023-04-21T13:23:37+5:302023-04-21T13:24:33+5:30

केंद्र मंत्रालयाने ‘जीवन प्रमाण’ नावाचे ॲप तयार केले आहे

Relief to pensioners; Get Hayati certificate from home on mobile app | पेन्शनधारकांना दिलासा; घरबसल्या मोबाईल ॲपवर काढा हयातीचा दाखला

पेन्शनधारकांना दिलासा; घरबसल्या मोबाईल ॲपवर काढा हयातीचा दाखला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही निवृत्तिवेतनधारक आहात. तुम्हाला दरवर्षी बँकेत हयातीचा दाखल द्यावा लागतो, त्यासाठी पीएफ कार्यालयात अनेक खेटे मारावे लागतात. वेळेवर हयातीचे प्रमाणपत्र दाखल केले नाही तर निवृत्तिवेतन बंद होण्याची भीती असते. अहो, आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. होय, खास निवृत्तिवेतनधारकांसाठी केंद्र सरकारने ‘जीवन प्रमाण ॲप’ आणले आहे. याद्वारे घरी बसूनच तुम्ही आता ‘हयातीचा दाखला’ काढू शकता. ऑनलाईन बँकेत हे हयातीचे प्रमाणपत्र दाखल होऊ शकते. या ॲपमध्ये चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आहे.

दरवर्षी द्यावा लागतो हयातीचा दाखला निवृत्तिवेतनधारकांना दरवर्षी हयातीचा दाखला बँकेत जमा करावा लागतो. त्यासाठी याद्वारे निवृत्तिवेतन घेणारी व्यक्ती जिवंत आहे. हे सुनिश्चित केले जाते. हा हयातीचे प्रमाणपत्र दिले नाही तर निवृत्तिवेतन थांबविले जाते. यामुळे दरवर्षी हयातीचा दाखल द्यावाच लागतो.

ॲपवर मिळावा दाखला
केंद्र मंत्रालयाने ‘जीवन प्रमाण’ नावाचे ॲप तयार केले आहे. हे ॲप आपण मोबाईल, कॉम्प्युटरवर प्ले स्टोअरला जाऊन ‘जीवन प्रमाण ॲप’ डाऊनलोड करू शकता. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर नोंदणीकरावी लागते. यात चेहरा प्रमाणीकरण केले जाते. हे सर्व डिजिटल करता येते. घरबसल्या हयातीचा दाखल मिळू शकतो.

कुठली माहिती आवश्यक ?
जीवन प्रमाण ॲपवर निवृत्तिधारकांचा आधार क्रमांक, नाव, बँक खात्याचा क्रमांक, तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबर, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) माहिती द्यावी लागते. विशेष म्हणजे ॲपवरही माहिती भरल्यावरच पुढील प्रक्रिया सुरू होते. संपूर्ण माहिती ॲपवर डाऊनलोड करावी लागते. त्यानंतर हयातीचे प्रमाणपत्र मिळते.

सुविधेचा फायदा घ्यावा...
आता ‘जीवन प्रमाण ॲप’ हे डिजिटल माध्यम केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहे. यामुळे निवृत्तिवेतनधारकांना ईपीएफओच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. घरूनच हयातीचे प्रमाणपत्र भरून दाखल करता येते.
- रमेश कुमार, विभागीय आयुक्त-२ ईपीएफओ

Web Title: Relief to pensioners; Get Hayati certificate from home on mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.