‘महात्मा फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन व्हावा’
By Admin | Published: September 7, 2014 12:18 AM2014-09-07T00:18:28+5:302014-09-07T00:28:48+5:30
नांदेड: महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशी भूमिका प्रा. श्याम मुडे यांनी येथे मांडली.
नांदेड: महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा, अशी भूमिका प्रा. श्याम मुडे यांनी येथे मांडली. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर शनिवारी आयोजित सभेत बोलत होते.
५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो याचा निषेधही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी प्रा. मुडे म्हणाले, महात्मा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान सर्वज्ञात आहे.
स्त्रियांना तसेच शूद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या तसेच बहुजन वर्गाला शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. याउलट ज्यांचा उल्लेख करुन शिक्षक दिन साजरा होतो त्यांनी मनुस्मृतीतील आदेशाप्रमाणे ‘न स्त्री स्वातंत्र्य अर्हती’ अशी भूमिका घेतलेली दिसते.
स्त्री शिकल्याने धर्म बुडतो, अशी भीती त्यांना वाटत होती. यावेळी प्रा. मुडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सूत्रसंचालन प्रा. युगंधर जमदाडे यांनी केले.
प्रास्ताविक सुदर्शन जोंधळे तर मनेष खटावे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुप्रिया गायकवाड, धम्मानंद सोनकांबळे, स्वाती आदोडे, दत्तराम रगडे, रोहिणी सोनकांबळे, रुपा, अतुलराज बेळीकर, राहुल गच्चे, राजेश धनपलवार, प्रदीप भिसे, साहेबराव वाघमारे, सचिन नांगरे, किरण तुरेराव, नंदलाल लोकडे आदींनी परिश्रम घेतले.