बायपासवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 06:16 PM2019-03-12T18:16:21+5:302019-03-12T18:18:54+5:30
सुरुवातीच्या चार तासांमध्ये दहापेक्षा अधिक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
औरंगाबाद : महापालिका आणि पोलिसांनी आज दुसऱ्या दिवशी बीड बायपास रोडवर अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केली. सकाळी 11 वाजेपासून देवळाई चौक येथील पक्की अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू झाले.
या कारवाईला प्रारंभी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच जमीन मालकांनी कडाडून विरोध केला. अनेकांनी न्यायालयाचा हवाला देत स्थगिती आदेश दाखविला. काही व्यापाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याचा संदर्भ दिला. महापालिकेने कोणतीच गोष्ट ग्राह्य न धरता अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला.
सुरुवातीच्या चार तासांमध्ये दहापेक्षा अधिक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. बहुचर्चित सुर्या लॉन्स येथे मार्किंग करण्यात आली. सोमवारी महापालिकेने एमआयटी ते जबिंदा लॉन्सपर्यंत एक किलोमीटरचा रस्ता मोकळा केला होता. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून महापालिकेने मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पहा व्हिडिओ :