रखेलीच्या आतेभावानेच काढला काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:05 PM2019-02-12T23:05:40+5:302019-02-12T23:06:14+5:30

प्रकाश कासारे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. रखेलीच्या आतेभावानेच कासारे यांचा कारमध्ये गळा आवळून खून केला. चिकलठाणा पोलिसांनी हिनानगरातून आरोपी अंकुश नामदेव तुपे (२९, रा. हिनानगर, चिकलठाणा) यास अटक केली असून, त्याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Removal of the sprayed by the spray | रखेलीच्या आतेभावानेच काढला काटा

रखेलीच्या आतेभावानेच काढला काटा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकाश कासारे याचा दाबला गळा : मारेकऱ्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : प्रकाश कासारे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. रखेलीच्या आतेभावानेच कासारे यांचा कारमध्ये गळा आवळून खून केला. चिकलठाणा पोलिसांनी हिनानगरातून आरोपी अंकुश नामदेव तुपे (२९, रा. हिनानगर, चिकलठाणा) यास अटक केली असून, त्याला न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्रकाश कासारे व अंकुश तुपे हे दोघे रविवारी (दि.१०) रात्री शेंद्रा परिसरातील एका बारमध्ये सोबत दारू पिले. बारमध्ये त्यांची हुज्जत झाली होती. बारमधून बाहेर येऊन ते रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीकडे आले. तेथे कासारे लघुशंकेसाठी गाडीतून बाहेर आले. त्यांचा फोन गाडीतच होता. त्याचवेळी एका महिलेचा फोन आला. तो तुपेने उचलला. फोन कॉल घेतल्यामुळे कासारे चिडले व दोघांत शाब्दिक चकमक सुरू झाली. दोघेही गाडीत बसून भांडत असताना कासारे यांनी तुपेच्या तोंडात चापट मारली. त्या रागाने तुपेने कासारे यांचा गळा आवळला. काही वेळात कासारे निपचीत पडल्याचे पाहून आरोपी तुपेने कासारेचा मृतदेह गाडीत स्टेअरिंगसमोर बसविला आणि काढता पाय घेतला.
नातेवाईकांचा घाटीत ठिय्या
प्रकाश कासारे यांचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचा संशय नातेवाईकांना आल्याने त्यांनी घाटीत ठिय्या दिला होता. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांच्यासोबत कोण कोण होते, याची माहिती घेतली. त्यानुसार अंकुश तुपे यास सोमवारी रात्री त्याच्या घरून पोलिसांनी उचलले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु पोलिसांनी विश्वासात घेतल्याने त्याने तोंड उघडले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
‘ती’ कार वर्षभरापूर्वीच विकलेली
घटनास्थळी सापडलेली कार ही कासारे यांनी वर्षभरापूर्वीच मित्राला विकली होती. कासारे ती कार अधूनमधून घेऊन जात होते. पोलिसांनी कारमालकासही चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र, त्याला नंतर सोडून देण्यात आल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी केलेल्या शिवीगाळीचाही राग
आरोपीच्या नातेवाईक महिलेशी कासारेचे अनैतिक संबंध होते. त्या महिलेच्या आई-वडिलांना कासारे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवीगाळ केली होती. त्याचा रागही आरोपीला होता. शिवाय कासारेने तोंडात चापट मारल्याने त्याचा राग अनावर झाला व त्याने खून केला, अशी कबुली आरोपी तुपे याने दिल्याचे पोलिसांना सांगितले. आपल्या म्हाताºया नातेवाईकांस शिवीगाळ केल्याचा राग तुपेच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने कासारे याला हॉटेलात जास्त प्रमाणात दारू पाजली होती. त्यामुळे कासारे यांना गाडीही चालविता येत नव्हती. म्हणून तुपे यानेच कंपनीपर्यंत गाडी चालवीत आणल्याची कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
असा मिळाला ‘क्लू’
कासारे यांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत होते. त्यावरून पोलीस तपासाला लागले होते. कासारे यांचे एका महिलेशी संबंध असल्याची चर्चा पोलिसांच्या कानी आली. तिला शेंद्रा परिसरातच त्याने फ्लॅट घेऊन दिल्याची माहितीही समजली. त्या धाग्यावरून पोलिसांना लिंक मिळाली व पोलीस त्या महिलेपर्यंत आणि तेथून तुपेपर्यंत पोहोचले.

मोबाईल व कानातील झुमका सापडला
गाडीत कासारे यांचा मोबाईल आणि महिलेच्या कानातील झुमका सापडला असून, तो नेमका कुणाचा? गाडीत आणखी कुणी हजर होते काय? गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदनातून समजले; परंतु या खुनाच्या कटात अजून कोणी सहभागी होते का, याचा शोध चिकलठाणा पोलीस घेत आहेत.
१६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
कासारे यांचा मारेकरी अंकुश तुपे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोळंके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Removal of the sprayed by the spray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.