'वैद्यकीय शिक्षण सचिव हटवा', औरंगाबादेत २५० डॉक्टर सामूहिक रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:14 PM2022-02-05T12:14:49+5:302022-02-05T12:15:43+5:30
आंदोलक डॉक्टरांनी ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले.
औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण सचिवांना हटविण्याची मागणी करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) २५० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, व सहाय्यक प्राध्यापक आज शनिवारी सामुहिक रजेवर गेले आहेत. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी सुरुवातीला रॅली काढून घटनेचा निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टरांचा सहभाग होता.
'एमएसएमटीए'ची शुक्रवारी घाटीत बैठक पार पडली. यात वैद्यकीय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवा. तसेच अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी सुरुवातीला रॅली काढून घटनेचा निषेध केला. यावेळी घोषणा देण्यात आल्या. तसेच विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन संतप्त भावना वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केल्या.
ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले. त्यानंतर सर्व वरीष्ठ डाॅक्टरांनी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांना सामुहीक रजेच्या आंदोलनाची पुर्वसुचना व मागण्यांचे निवेदन संघटनेकडून अध्यक्ष डाॅ. भारत सोणवणे यांनी दिले. त्यानंतर शनिवारी सकाळी सर्व वरिष्ठ डॉक्टर रजेवर गेले.