ध्यानधारणेपूर्वी दूर करा मनावरची जळमटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:20 PM2019-07-06T23:20:36+5:302019-07-06T23:20:54+5:30
ध्यानधारणा करताना सुरुवातीला मन केंद्रित करणे अवघड जाते. अनेक विचार मनात डोकावू लागतात. जोपर्यंत मनावरचे हे विचारांचे मळभ दूर होत नाही, तोपर्यंत ध्यानधारणेतून योग्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मनावरची जळमटे दूर करा, असे मार्गदर्शन डॉ. कपिल ठाकूर यांनी केले आणि ‘मन शुद्धीकरण’ कसे करायचे, हे शिकविले.
औरंगाबाद : ध्यानधारणा करताना सुरुवातीला मन केंद्रित करणे अवघड जाते. अनेक विचार मनात डोकावू लागतात. जोपर्यंत मनावरचे हे विचारांचे मळभ दूर होत नाही, तोपर्यंत ध्यानधारणेतून योग्य फायदे मिळत नाहीत. त्यामुळे ध्यानधारणेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मनावरची जळमटे दूर करा, असे मार्गदर्शन डॉ. कपिल ठाकूर यांनी केले आणि ‘मन शुद्धीकरण’ कसे करायचे, हे शिकविले.
हार्टफुलनेस संस्थान, रामचंद्र मिशन आणि ‘लोकमत’च्या सहकार्याने एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात तीनदिवसीय ‘ध्यानोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘ध्यानोत्सव’चे दुसरे सत्र पार पडले. डॉ. कपिल ठाकू र, डॉ. मानसी ठाकूर, लोकमत समाचारचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुसऱ्या सत्रात डॉ. ठाकूर यांनी ध्यानधारणा म्हणजे काय, कशाचे ध्यान करायचे, ध्यान कुठे करावे आणि कसे करावे, या सर्वसामान्य लोकांना कायम पडणाºया महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, ध्यान करणे म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे होय. ज्या विचारावर लक्ष केंद्रित करतो, तसा परिणाम आपल्यावर होत जातो. त्यामुळे कशाचे ध्यान करायचे, हे सांगताना त्यांनी ‘ईश्वरीय प्रकाश’ या गोष्टीचे ध्यान करण्याचा सल्ला दिला. हृदयामधूनच सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. त्यामुळे आपल्या हृदयातच ही दिव्य शक्ती आहे, असे समजून शांतचित्ताने ध्यान करावे, असे त्यांनी सूचित केले. मन शुद्धीकरण सगळी कामे संपल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी करावे.
डॉ. मीनाक्षी भन्साळी यांनी हार्टफुलनेस यांच्या वतीने ५ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी राबविण्यात येणाºया ब्राईटर माइंड्स या उपक्रमाविषयी माहिती दिली. डॉ. मानसी आणि डॉ. सूर्यवंशी यांनीही ध्यानाचे फायदे सांगितले.
चौकट :
‘ध्यानोत्सव’चा आज समारोप :
तीनदिवसीय ‘ध्यानोत्सव’ उपक्रमाचा रविवारी (दि. ७) समारोप होत आहे. सायं. ५:३० वा. रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होईल. १५ वर्षांवरील सर्वांसाठी कार्यक्रम खुला असून, प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य यानुसार दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी येऊन आपले आसन निश्चित करावे.